Sai Pallavi Video: बहिणीच्या लग्नात साई पल्लवीचा 'झिंगाट'वर जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले-

Sai Pallavi Dance On Zingaat: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात ती झिंगाटवर नाचताना दिसतेय.
sai pallavi
sai pallaviesakal
Updated on

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच मात्र तिच्या नो मेकअप पॉलिसीने चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडलं. साई चाहत्यांची प्रचंड लाडकी आहे. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. त्याचं कारण आहे तिचा एक व्हिडिओ. साईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती चक्क 'झिंगाट' गाण्यावर नाचताना दिसतेय. ती झिंगाटवर थिरकताना दिसतेय. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत.

साई पल्लवीच्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात तिच्या बहिणीच्या हळदीचे आणि संगीत सोहळ्याचे व्हिडिओदेखील आहेत. यापूर्वी साईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ती चक्क मराठी गाणं 'अप्सरा आली' वर नाचताना दिसली होती. हा व्हिडिओ पाहून तिच्या नृत्याचं प्रचंड कौतुक झालं होतं. आता तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

मराठमोळे गायक अजय अतुल यांच्या 'धडक' चित्रपटातील 'झिंगाट' या गाण्यावर ती नाचताना दिसतेय. त्यात ती एकटी नाहीये तर ती तिच्या नातेवाईकांसोबत परफॉर्म करताना दिसतेय. तिची एनर्जी पाहून चाहतेही तिच्यावर पुन्हा फिदा झाले आहेत. यादरम्यान तिने निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पलाझो परिधान केला आहे. मॅचिंग निळ्या बांगड्या आणि मोत्यांचा हार तिच्यावर आणखीनच उठून दिसत होता. तिच्या लूकचंही चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

साई पल्लवीने ‘फिदा’, ‘प्रेमम’, ‘लव्हस्टोरी’, ‘काली’, ‘मारी २’, 'श्याम सिंघा रॉय' या चित्रपटात काम केलं आहे. लवकरच ती बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरबरोबर काम करणार आहे. यासोबतच ती ‘थंडेल’ सिनेमातही झळकणार आहे, ज्यामध्ये नागा चैतन्य तिच्या सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

sai pallavi
BB Marathi 5 : निक्कीचे चाहते वोटींगमध्ये लावतायत जोर, घराबाहेर होणार कोण? वाचा Opening Voting Trends

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.