तर तसा नवरा मला नको... लग्नाबद्दल स्पष्टच बोलली सई ताम्हणकर; अपेक्षा सांगत म्हणाली, 'काही महिन्यानंतर

Sai Tamhnakar Talked About Her Marriage: लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या लग्नाबद्दलचे विचार सांगितले आहेत. सध्या तरी आपण कुणाच्या शोधात नसल्याचं ती म्हणाली आहे.
sai tamhankar
sai tamhankar esakal
Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिने अनेक हिट चित्रपटात काम केलंय. ती मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आता तर सई मराठीसोबतच हिंदीमध्येही धमाकेदार कामगिरी करत आहे. ती लवकरच 'मानवत मर्डर्स' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात आशुतोष गोवारीकर, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांच्याही मुख्य भूमिका आहेत. आता यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सईने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

सईने नुकतीच मुंबई तकला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना सईने तिला कसा पार्टनर हवा हेदेखील सांगितलं. सई म्हणाली, ''लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे. रोज यासाठी काम करावं लागतं. मी अजूनही लग्नाकडे कशी पाहते हे मला माहीत नाही. मला माझ्या व्यापातून या गोष्टींकडे वेळ द्यायला जमलं नाही. आता जमाना बदलला आहे. वेगवेगळ्या प्रकारची लग्न, रिलेशनशिप आता आहेत. हे बरोबर की चूक यात न घुसता आता ते स्वीकारायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचे पॉइंट ऑफ व्ह्यूज वेगळे असतात. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आपण त्याचा आदर केला पाहिजे. इतकी वर्ष चालत आलेली ही संस्था आहे म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असावं."

ती पुढे म्हणाली, "मला आयुष्यभर एकटीला राहायलाही आवडणार नाही. मी खूप लाघवी, कुटुंब हवी असणारी मुलगी आहे पण या स्टेजला मला लग्न करायचंय का? तर नाही. मी भावनिकरित्या स्थिरावण्याचा विचार केला आहे. पण मी एका जागी स्थिरावणारी व्यक्ती नाही. मी शांत बसू शकत नाही असा माझा स्वभाव आहे. सध्या त्यासाठी काही प्रयत्न नाही सुरु आहेत. असं वाटतं काही महिन्यांनंतर प्रयत्न सुरु करेन. नात्यात पारदर्शकता, आदर, स्वातंत्र्य असणं फार महत्वाचं वाटतं. एका पार्टनरने दुसऱ्याला विचारलं की मला सोलो ट्रिपला जायचंय. दुसरी व्यक्ती विचारते का? तर ही का विचारणारी व्यक्ती मला नकोय. म्हणून मी थांबलेय असं मला वाटतं. या गोष्टी असल्या तर नातं आणखी फुलतं, बहरतं.''

सईचा २०१५ साली घटस्फोट झाला होता. काही वर्षांपासून ती अनिश जोगसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुलीही दिली होती. मात्र सईने अद्याप लग्न केलेलं नाही. तिचं ब्रेकअप झालं आहे का अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

sai tamhankar
एक नाही तर दोन मुलींचा बाप होता गोविंदा पण एकीचं तिसऱ्या महिन्यातच झालं निधन; पत्नीने सांगितलं मृत्यूचं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.