Entertainment News: 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारा लोकप्रिय बालकलाकार सिम्बा म्हणजेच साईराज केंद्रे याने आपल्या अभिनयाने सगळ्यांना आपलंसं केलंय. साईनाथच्या 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्याने सगळ्यांना वेड लावलं होतं. त्याचं हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. त्याचे सुंदर हावभाव पाहून सगळेच त्याचे फॅन झाले. त्यानंतर त्याला 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेसाठी विचारणा करण्यात आली. या मालिकेतही त्याने सिम्बा बनून सगळ्यांवर छाप पाडली. मात्र आता प्रेक्षकांच्या लाडक्या सिम्बाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलंय.
मालिकेच्या शूटिंगसाठी साईराज घरापासून आणि आई- वडिलांपासून दूर राहतो. त्यामुळे या दिवाळीच्या सुट्टीमध्ये तो घरी आला होता. मात्र आता पुन्हा एकदा तो शूटिंगसाठी आईला सोडून दूर गेलाय. मात्र तो घरातून निघतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आपल्या वडिलांबरोबर घरातून निघताना साईराज आपल्या आईला मिठी मारून हमसून हमसून रडताना दिसतोय. त्याच्या आईलादेखील आपल्या लेकाला पुन्हा जाताना पाहून अश्रू अनावर झालेत. या व्हिडिओवर 'दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आईला सोडून राहण्याचा पहिला प्रवास सुरू झाला.' असं कॅप्शन देण्यात आलंय. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही भावुक झालेत.
नेटकऱ्यांनीदेखील त्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्याला हिंमत दिली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'साईराज असा रडू नको बाळा. तुला खूप मोठा अभिनेता व्हायचंय.' दुसऱ्याने लिहिलं, 'साई प्लीज रडू नको. कुठलेच बाळ आपल्या आई पासून लांब राहू शकत नाही पण तुझे काम खरंच खूप छान आहे मला तर तु खूप आवडतोस. तुला अजून खूप चांगले काम करायचे आहे म्हणल्यावर थोडे लांब राहावे लागणार बाळा. खूप मोठा हो तुझ्या कामात तुला असेच यश मिळू दे.' सिम्बाला चाहते धीर देताना दिसतायत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.