Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीकडे तुरुंगातील डॉक्टरांनीच मागितली लाच

Salman Khan Firing Case Accused Alleges Jail Doctors: तळोजा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप आरोपी हरपाल सिंह याने केला आहे.
salman khan
salman khan esakal
Updated on

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई याचा हात असल्याचं समोर आलं होतं. मात्र आता हे प्रकरण एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणी तुरुंगात असलेल्या एका आरोपीने जेलमधील एका डॉक्टरवर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. आठ महिन्यांपूर्वी झालेली जखम अजूनही तशीच तशीच आहे. त्याचं कारण तुरुंगातील डॉक्टर त्याच्याकडे उपचारासाठी पैसे मागत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोप हरपाल सिंग एक महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदाच्या स्पेशन कोर्टमध्ये न्यायाधीश बीडी शेळके यांच्यासमोर सुनावणीसाठी उभं करण्यात आलं. यादरम्यान त्याने तळोजा तुरुंगातील चीफ मेडिकल ऑफिसरवर (सीएमओ) आरोप केले की त्यांनी उपचारासाठी त्याच्याकडे लाच मागितली. सिंग याने बुधवारी न्यायालयात सांगितलं की, गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. सीएमओने त्याला रुग्णालयात पाठवण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्याने केला आहे. न्यायालयाने या प्रकरणी ७ ऑक्टोबरपर्यंत अहवाल मागवला आहे.

न्यायालयाने तळोजा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना (सीएमओ) अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सिंग याच कारागृहात आहेत. न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला आरोपींना आवश्यक उपचार देण्यास सांगितलं आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी दोन मोटारसायकलस्वारांनी सलमानच्या वांद्रे येथील निवासस्थान गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पाच राऊंड गोळीबार केला. या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोईने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

salman khan
अनंत-राधिकाच्या लग्नात येण्यासाठी कलाकारांना पैसे दिले गेले? अनन्या पांडेने सांगितलं सत्य, म्हणते-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.