Entertainment News: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यापूर्वी तिने दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचे खुलासे केले होते. आता तिने सुशांत सिंग राजपूत बद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडिया तापलंय. तिने सुशांतची हत्या झाली असल्याचा दावा केलाय. पण पोस्टमोर्टम मध्ये त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं असं ती म्हणालीये.
सोमीने रेडीटवर एक आस्क मी एनिथिंगचं सेशन घेतलं होतं. या सेशन दरम्यान तिने अनेक धक्कादायक खुलासे केले. या सेशनमध्ये तिला एका युझरने सुशांत सिंग प्रकरणाबद्दल तुला काय वाटतं असा प्रश्न विचारला. जसं बॉलिवूडने त्याला वागवलं हे खूप निराशाजनक होतं. त्यावर सोमीने उत्तर देत लिहिलं, 'त्याची हत्या केली गेली आणि त्याला आत्महत्येचं स्वरूप दिलं गेलं. एम्सच्या डॉक्टरांना सुधीर गुप्ता यांना जाऊन विचारा ज्यांनी त्याचा पोस्टमोर्टम रिपोर्ट बदलला. का?' जेव्हा सुशांतचं निधन झालं होतं तेव्हाही सोमीचा त्याने आत्महत्या केल्याच्या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता.
त्यानंतर एका युझरने तिला या परिस्थितीत तू कुणासाठी न्याय मागू इच्छितेस असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना तिने लिहिलं, 'एसएसआर, जिया खान आणि अनेक जण ज्यांना न्याय मिळायला हवा. रवींद्र पाटीलबद्दल काय विचार आहेत? जरा गुगल करून बघा त्याच्यासोबत काय झालं होतं?
रवींद्र पाटील हा सलमान खानच्या हिट अँड रन खटल्यातील मुख्य साक्षीदार होता आणि त्याने मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. एलिट कमांडो पथकासाठी त्याची निवड झाली. त्याला सलमानच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते. 2002 च्या हिट-अँड-रन प्रकरणात त्याने साक्ष दिली की, सलमान गाडी चालवत होता आणि दारूच्या नशेत होता. लाच आणि धमक्या मिळाल्यानंतरही तो आपल्या वक्तव्यावर ठाम होता. एका वर्षात त्याच्यासोबत बरंच काही घडलं. अटक झाली, नोकरी गेली. तो रस्त्यावर आला. 2 वर्षे टीबीशी झुंज दिल्यानंतर आणि शेवटचे दिवस भिकाऱ्यासारखे घालवल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हिट अँड रन प्रकरणात सलमानची निर्दोष मुक्तता झाली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. हे सर्वजण फूटपाथवर झोपले असताना गाडी त्यांच्यावर चढवण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.