आम्ही तुमच्या मंदिरात येऊन पूजा... सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा लॉरेन्स बिष्णोईला मेसेज; म्हणाली-

Somy Ali Massage Lawrence Bishnoi For Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला वाचवण्यासाठी त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली पुढे आली आहे. तिने थेट लॉरेन्स बिष्णोईसाठी मेसेज लिहिला आहे.
Somy Ali
somy ali salman khan esakal
Updated on

Somy Ali Social Media Post: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बिष्णोई गँगने थेट धमकी दिली होती. सलमानच्या जीवाला धोका आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. बिश्नोईच्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. मात्र आता त्याच्या जीवासाठी अभिनेत्री आणि सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली पुढे आली आहे. तिने थेट लॉरेन्स बिष्णोई याला मेसेज करत आपण तुमच्या मंदिरात जाऊन पूजा करायला तयार असल्याचं सांगितलं आहे. तिने लॉरेन्स बिष्णोईला भाऊ म्हणत त्याच्याकडून मोबाईल नंबरदेखील मागितला आहे.

लॉरेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करत सोमी अलीने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हा लॉरेन्स बिश्नोईसाठी थेट संदेश आहे. नमस्कार लॉरेन्स भाऊ. तुरुंगातूनही तुम्ही झूम कॉल करत असल्याचं मी ऐकलं आणि पाहिलं आहे, त्यामुळे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. कृपया मला सांगा की हे कसं होऊ शकतं?

सोमीने पुढे लिहिलं की, 'संपूर्ण जगात आमचं सगळ्यात आवडतं ठिकाण राजस्थान आहे. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी यायचे आहे, पण आधी तुमच्याशी झूम कॉल करू आणि पूजेनंतरही बोलू. मग माझ्यावर विश्वास ठेवा की हे फक्त तुमच्या फायद्यासाठी आहे. कृपया मला तुमचा मोबाईल नंबर द्या, तुमचे खूप मोठे उपकार होईल. धन्यवाद.' एका यूजरने यावर प्रतिक्रिया देत लिहिलं की ही गोष्ट खूप चांगली आहे. तर सोमीने उत्तर देत लिहिलं की, 'अहो, हे कुणाच्यातरी जीवनाबद्दल आहे. मग का नाही?'

लॉरेन्स बिश्नोई आहे तुरुंगात

लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असून त्याच्या टोळीतील सदस्यांनी सलमानच्या जवळच्या बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या केल्याची माहिती आहे. याची जबाबदारी घेत त्याने सलमानसोबत कुणीही असलं तर त्यालाही बघून घेऊ अशी धमकी दिली. यापूर्वी ईदनंतर सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली. जेव्हा गायक एपी ढील्लो सलमानसोबत काम करत होते, तेव्हा बिश्नोई टोळीने त्यांच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबार केला होता.

Somy Ali
स्टेजवरून अचानक पळत सुटला निक जोनास, सेक्युरिटीला केला इशारा, प्रियांकाच्या पतीला मारण्याचा होता प्लॅन?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.