Salim Khan Death Threats: लॉरेन्स बिष्णोई को भेजू क्या? सलमाननंतर आता वडील सलीम खान यांना धमकी; बाइकवरून आला अन्

Salman Khan Father Salim Khan Get Death Threat: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या पाठोपाठ आता त्याचे वडील सलीम खान यांनाही धमकी मिळाली आहे.
salim khan death threat
salim khan death threatesakal
Updated on

Lates Bollywood Updates in Marathi: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला यापूर्वी अनेकदा लॉरेन्स बिष्णोई गॅंग कडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्याने कधीही या धमक्यांना प्रत्युत्तर दिलं नाही. मात्र आता हे प्रकारण आणखी गंभीर होताना दिसतंय. सलमान पाठोपाठ त्याचे वडील सलीम खान यांनाही आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अनोळखी व्यक्तीकडून ही धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिष्णोई को भेजू क्या? असं म्हणत एका अनोळखी इसमाने सलीम यांना धमकी दिली आहे. सलीम खान हे सकाळी मॉर्निंग वॉल्कसाठी गेले असताना एका अनोळखी इसमाने त्यांना ही धमकी दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज गुरुवार १९ सप्टेंबर रोजी सलीम खान नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉल्कसाठी गेले होते. तेव्हा एका अनोळखी इसमाने बाईकवरून येत त्यांच्या समोर येऊन त्यांना थेट धमकी दिली. सलीम खान यांचे सुरक्षा रक्षक हालचाल करण्यापूर्वी बाईकस्वार पसार झाले. लॉरेन्स बिष्णोई को भेजू क्या अशा शब्दात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलीम हे बॉलिवूडचे मोठे अभिनेते, निर्माते, स्क्रीन रायटरदेखील आहेत. त्यांना धमकी मिळाल्याने आता पुन्हा एकदा पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. याप्रकरणी शिवडीवरून एका इसमाला अटकदेखील करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच सलमानच्या वांद्रे येथील घरावर बिश्नोईंच्या काही माणसांनी गोळीबार केला होता. त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा मिळालेल्या धमकीमुळे सलमानची चिंता वाढली आहे. सलमानने 'हम साथ साथ हैं' च्या शूटिंगदरम्यान राजस्थान येथे कळविटांची शिकार केली होती. त्यामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे बिष्णोई गॅंग कडून सतत त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.

salim khan death threat
Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीकडे तुरुंगातील डॉक्टरांनीच मागितली लाच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.