Entertainment News: नागा चैतन्य याच्याशी घटस्फोट झाल्यानंतर कोलमडून गेलेली सामंथा रूथ प्रभू हिने अनेक संकटांवर मात केली. घटस्फोटानंतर तिने ‘मायोसिटिस’ या गंभीर आजाराशी लढा दिला. सगळ्या लढाया लढत ती आता '‘सिटाडेल: हनी बनी’ या नव्या वेबसीरिजमध्ये झळकत आहे. यात तिने एका गुप्तहेर असलेल्या आईची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. आता सीरिजमध्ये आई बनलेल्या सामंथाला खऱ्या आयुष्यातही आई व्हायचंय. एका मुलाखतीत ती आई होण्याबद्दल स्पष्टपणे बोलली आहे.
सामंथाने नुकतीच टाइम्स नाऊ;या मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, 'माझं अजूनही आई व्हायचं स्वप्न आहे. हो, मी नेहमीच आई व्हायची इच्छा बाळगली आहे, कारण तो एक सुंदर अनुभव आहे. वयाचा विचार न करता, मी आई होण्याची वाट बघतेय. अनेकजण वयाबद्दल चिंता करतात, पण मला वाटतं की आई होण्यासाठी कुठलंही असं ठराविक वय नसतं. माझी आई होण्याची इच्छा अजूनही कायम आहे. वय कधीही आई होण्याच्या इच्छेमध्ये अडथळा ठरू शकत नाही. आयुष्याच्या या टप्प्यावर माझी सेटल होण्याची इच्छा अजूनही कायम आहे. ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये बालकलाकाराबरोबर काम करताना मला मी जणू काही माझ्या स्वत:च्या मुलीशी संवाद साधत आहे असं वाटलं. त्यामुळे मला आई व्हायचंय हे मी नक्की ठरवलंय.'
मायोसीटीस या आजाराबद्दल विचारणा केली असता सामंथा म्हणाली, 'सध्या मी खूप आनंदी आहे. आता मी स्वतःची काळजी घ्यायला आणि जीवनातील महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकले आहे. माझ्या आयुष्यात सध्या मी एक चांगला काळ अनुभवतेय. मी दैनंदिन जीवनातील लहान लहान क्षणांचा आनंद घेत आहे. मला दररोज हे आयुष्य जगण्याची संधी मिळत असल्याने मी खरोखर आनंदी आहे.' सामंथा लवकरच ‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही बर्वेच्या ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.