आणि ती माउली हसली ते शेवटचीच... जेव्हा मित्राने आईला संदीपचं नाटक दाखवायला आणलं, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला-

Sandeep Pathak Recall About Varhad Nighala Londonla: लोकप्रिय मराठी अभिनेता संदीप पाठक याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता त्याने एक डोळ्यात पाणी आणणारा किस्सा सांगितला आहे.
sandeep pathak
sandeep pathak esakal
Updated on

मराठमोळा अभिनेता संदीप पाठक याने आपल्या अभिनयाने मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये ठसा उमटवला. त्याने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्याचं 'वऱ्हाड निघालं लंडनला' हे नाटक रंगभूमीवर चांगलच गाजतंय. या नाटकाचे परदेशातही दौरे होतात. हसून हसून पोट दुखायला लावणाऱ्या या नाटकाचा सर्वेसर्वा संदीप आहे. त्याचा नाटकामधील अभिनय आणि सादरीकरण पाहण्यासाठी प्रेक्षक त्याच्या नाटकाला गर्दी करतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संदीपने या नाटकाबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. जेव्हा त्याचा मित्र त्याच्या आजारी आईला हे नाटक पाहायला घेऊन आला होता. तेव्हा त्या हसल्या त्या शेवटच्याच असं संदीपचा मित्र म्हणाला.

संदीपने काही दिवसांपूर्वी मित्र म्हणे या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना संदीप म्हणाला, 'माझा बोरिवलीला प्रयोग होता आणि माझा मित्र मला म्हणाला की मी आईला घेऊन येतो. मी म्हटलं अरे ये ना. त्याच्या आईला झालेला कॅन्सर. तो प्रयोगाला आला. आणि तिने एवढं एन्जॉय केलं ना, इतकी हसत होती. आणि मंग्या समोर नाटक बघण्याच्या ऐवजी असं नाटक बघत होता. आईकडे बघत होता. प्रयोग संपला. मंग्या त्यांना घेऊन माझ्याजवळ आला. त्याची आई म्हणाली, खूप वर्षांनी हसले रे. आणि एवढं मी, माझ्या आजारपणात, आजारी असल्यापासून हसलीच नाही. आणि त्यानंतर मंगेशची आई काही महिन्यानंतर परत आजारी पडली. ती गेली.'

पुढे संदीप म्हणाला, 'मंग्याचा मला फोन आला. तो म्हणाला यार संदीप मला तुझं नाटक बघतानाचीच आई आठवते रे सारखी. तिचा तो हसरा चेहरा आठवतो. आणि ती शेवटचं त्याच दिवशी हसली ज्या दिवशी ती तुझ्या प्रयोगाला आली होती.' संदीपचा हा किस्सा ऐकून अनेकांनी त्याच्या कामाचं आणि त्याच्या वागण्याचं देखील कौतुक केलं आहे. संदीपच्या कामाबद्दल सांगायचं तर तो सध्या कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेत दिसतोय. या मालिकेत तो अंताजी दिग्रसकर या भूमिकेत दिसतोय.

sandeep pathak
घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिवाळी पार्टीसाठी आली उर्मिला मातोंडकर; पण त्या गोष्टींवर खिळली नेटकऱ्यांची नजर, म्हणाले-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.