या शुक्रवारी मोठ्या पडद्यावर दोन मोठे चित्रपट आपापसात भिडल्याचं चित्र आहे. एकीकडे अक्षय कुमारचा 'सरफिरा' प्रदर्शित झाला आहे. तर दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांचा 'इंडियन २' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत. त्यातच त्यांचा सामना आधीपासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसलेल्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाशी झाला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी सरफिरा आणि इंडियन २ यांच्यापैकी नेमकी कुणाची जास्त कमाई झाली हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
बॉलीवूडचा खिलाडी कुमार बऱ्याच दिवसांपासून एका मोठ्या हिट चित्रपटाची वाट पाहत होता. या वर्षी प्रदर्शित झालेला त्याचा 350 कोटी रुपयांचा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. अशा परिस्थितीत ‘सरफिरा’कडून सगळ्यांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. अक्षयनेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. मात्र थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 'सरफिरा'ला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही . अक्षयचा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. सैकनिल्कच्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी २ कोटी ४० लाखांची कमाई केली आहे. हे आकडे पुढे वाढण्याची शक्यता आहे.
कमल हसनचा 2024 चा मोस्ट अवेटेड चित्रपट 'इंडियन 2' देखील आज थिएटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट कमल हासनच्या 1996 मध्ये आलेल्या 'इंडियन' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामुळे 'इंडियन 2' रिलीज होण्याआधीच खूप गाजला होता, त्यामुळे या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 10.98 कोटी रुपयांची प्री-सेल कमाई केली होती आणि सैकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'इंडियन 2' ने रिलीजपूर्वी 26 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने तामिळ भाषेत १७ कोटींची कमाई केली आहे. मात्र हिंदी भाषेत चित्रपटाने केवळ १ कोटीची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी दोन्ही चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.