असं करण्याची काहीही गरज... आस्तादच्या 'कलावंत' ढोलताशा पथक सोडण्यावर सौरभ गोखलेने सोडलं मौन

Saurabh Gokhale On Aastad Kale: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे याने 'कलावंत' ढोलताशा पथक सोडण्यावर आता सौरभ गोखलेने भाष्य केलंय.
Saurabh gokhale on aastad kale
Saurabh gokhale on aastad kale esakal
Updated on

गणपती बाप्पा म्हटलं की आता ढोलताशा पथक हे एक समीकरण झालं आहे. बाप्पाच्या आगमनाला आणि विसर्जनाला ढोलताशा पथकांना मोठी मागणी असते. असंच पुण्यातील एक लोकप्रिय ढोलताशा पथक म्हणून प्रसिद्ध असलेलं 'कलावंत' ढोलताशा पथक. या पथकात मराठी कलाकार सहभागी झालेले दिसतात. अनुजा साठे, श्रुती मराठे, सौरभ गोखले असे अनेक कलाकार या ढोलताशा पथकात दिसतात. मात्र काही दिवसांपूर्वी अभिनेता आस्ताद काळे याने आपण हे ढोलताशा पथक सोडलं असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. आता आस्तादच्या निर्णयावर अभिनेता सौरभ गोखले याने मौन सोडलं आहे.

सौरभने नुकतीच आरपार या युट्युब चॅनेल मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्याला आस्तादच्या या निर्णयाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तो अगदी मिश्कीलपणे उत्तर देत म्हणाला, 'आम्हीही त्यावर जोक्स केलेत. हा वाद असा नव्हता, फक्त एखादा ग्रुप म्हटलं की त्यामध्ये मतभेद हे आलेच. त्याचप्रमाणे आमचं झालं. त्याची काही वेगळी मतं होती, आमची काही वेगळी मतं होती. त्याला काही गोष्टी योग्य नाही वाटल्या, आम्हाला काही गोष्टी योग्य नाही वाटल्या. फक्त त्याने जो निर्णय घेतला तो त्याला बरोबर वाटला पण आम्हाला फार टोकाचा वाटला.'

सौरभ पुढे म्हणाला, 'असा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती. कोणतीही गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणून सोडणं हा त्यावरचा उपाय नाही. पण हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यावर आम्ही कुणीही काही बोलणं योग्य नाही. सोशल मीडियावरही जेव्हा त्याच्या पोस्टची चर्चा झाली त्यावर आमच्यातल्या कुणीही भाष्य केलं नाही. कारण आम्हाला माहितेय की, आमची फार वैयक्तिक गोष्ट आहे, दुर्दैवाने ती सोशल मीडियावर आली.'

काय होती आस्तादची पोस्ट?

'नमस्कार.मी 'कलावंत पथक' सोडलं आहे. या पथकाशी, त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही.तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करू नये.' अशी पोस्ट आस्तादने केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्याने हे पथक का सोडलं याची एकच चर्चा रंगली होती.

Saurabh gokhale on aastad kale
Perfect Days : ‘स्लाइस ऑफ लाइफ’ प्रकारातील सुंदर सिनेमा ‘परफेक्ट डेज’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.