अरे तिच्यावर दया करा रे... 'या' गोष्टीमुळे झी मराठीची 'सावळ्याची जणू सावली' मालिका ट्रोल; नेटकरी म्हणतात-

Savlyachi Janu Savali Serial Trolled: छोट्या पडद्यावरील मालिका 'सावळ्याची जणू सावली' आता सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. मालिकेतील एक गोष्ट नेटकऱ्यांना खटकलीये.
savlyachi janu sawali serial troll
savlyachi janu sawali serial trollesakal
Updated on

छोट्या पडद्यावर नेहमीच वेगवेगळे विषय मालिकांच्या स्वरूपात हाताळले जातात. मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्याचा जणू अविभाज्य भाग बनतात. घराघरात या मालिका मोठ्या आवडीने पाहिल्या जातात. मालिकांमधील पात्र प्रेक्षकांच्या घरातील एक बनतात. मात्र कधीकधी मालिकेच्या कथेमाधे पाणी टाकून ती मालिका वाढवली जाते. तर कधी उगीच मालिकेची नायिका अबला नारी दाखवली जाते. मात्र अशा वेळेस प्रेक्षक आपल्या आवडत्या वाहिनीला आणि मालिकेच्या निर्मात्यांना जाब विचारतानाही दिसतात. अशीच एक मालिका आता सोशल मीडियावर ट्रोल होतेय. झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका आता ट्रोल होताना दिसतेय.

या मालिकेतील मुख्य नायिका सावली अतिशय हळवी आणि शांत दाखवली आहे. तिच्या आवाजाचा दुसरेच वापर करताना दाखवण्यात आलं आहे. तर मालिकेच्या नायकाची आई म्हणजेच तिलोत्तमा अतिशय कडक दाखवण्यात आलीये. नुकत्याच दाखवण्यात आलेल्या मालिकेच्या भागात नायकाला सावलीशी बोलताना बघून तिलोत्तमा तिच्या कानाखाली वाजवते. त्यावर सावली काहीही बोलत नाही. ती आपल्या भावामुळे आपण त्याच्याकडून मदत घेतली असं बोलू शकली असली मात्र ती काहीही बोलत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे हे पहिल्यांदा घडत नाहीये. यापूर्वीही सावलीला अनेकांनी कानाखाली मारताना दाखवण्यात आलंय. यावरही ती गुपचूप ऐकून घेताना दिसली. त्यामुळेच नेटकरी आता या मालिकेला ट्रोल करत आहेत.

savlyachi janu sawali serial troll
Box Office: 'भूल भुलैया ३' ने उडवली 'सिंघम अगेन'ची झोप; रविवारी पालटला गेम, कमावला ५० कोटींचा नफा, बजेट किती?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.