Marathi Movie: सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला; चित्रपटात झळकणार ४ जोड्या, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Panipuri New Marathi Movie Release: सहजीवनाची ही गंमत उलगडणारा ‘लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट’ सांगणारा ‘पाणीपुरी’ चित्रपट आपलं मनोरंजन करायला सज्ज आहे.
panipuri
panipuri esakal
Updated on

चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं 'युएसपी' असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्परविरुध्द, भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्त्वं एकत्र असणं ही देखील सहजीवनाची गरज असते. सहजीवनाची ही गंमत उलगडणारा ‘लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट’ सांगणारा ‘पाणीपुरी’ चित्रपट आपलं मनोरंजन करायला सज्ज आहे. एस.के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब, आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते भारत गणेशपुरे-प्राजक्ता हनमघर, बिनधास्त आणि मिश्किल स्वभावाने आपली प्रत्येक भूमिका गाजवणारे ऋषिकेश जोशी त्यांच्या जोडीला ब्युटीफुल अभिनेत्री प्रतीक्षा जाधवसोबत सचिन बांगर-अनुष्का पिंपूटकर हे दोन नवे तरुण चेहरे यात धमाल करणार आहेत. या जोड्यांच्या सोबतीला अभिनेता मकरंद देशपांडे, सायली संजीव, विशाखा सुभेदार हे अनुभवी कलाकार कथेत जबरदस्त रंग भरणार आहेत. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणाऱ्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजक ठरेल. ‘पाणीपुरी’ चित्रपटाचा मजेशीर टिझर नुकताच प्रदर्शित झाला. नर्म विनोदी, खेळकर पद्धतीने जीवनदर्शन घडवत या जोड्यांच्या प्रेमाची परिणीती, त्यांचा प्रवास भविष्यामध्ये कशाप्रकारे होतो याची गमतीशीर कथा म्हणजे ‘पाणीपुरी’ चित्रपट.

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत. ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

panipuri
अंकित मोहन म्हणतोय ‘झालोया मी पैलवान….अख्या महाराष्ट्राची शान’, बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणं प्रदर्शित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.