सायली संजीव ते सोनाली कुलकर्णी, 'या' मराठी कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन; पाहा कसे केलेत देखावे

Marathi Actors Ganeshotsav 2024: मराठी कलाकारांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं मनोभावे स्वागत केलं आहे. पाहा कलाकारांनी केलेले देखावे
ganeshotsav 2024
ganeshotsav 2024esakal
Updated on

Marathi Actors Gharguti Ganpati Festival 2024 : गेले वर्षभर सगळे ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत होते तो सण अखेर आला आहे. वर्षभराने प्रत्येकाच्या घरी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी वातावरणात एक वेगळाच आनंद भरून राहिला आहे. प्रत्येक मराठी माणूस या सणाची उत्सुकतेने वाट पाहत असतो. आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. अशातच मराठी कलाकारांनी देखील त्यांच्या घरी आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आहे. काहींच्या घरी ७ दिवसांचे तर काहींच्या घरी दीड दिवसाचे गणपती आले आहेत. पाहूया त्यांनी आपल्या बाप्पाचं कसं स्वागत केलंआहे.

स्वप्नील जोशी

अभिनेता स्वप्नील जोशी याच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन होतं. त्यांच्या घरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिचं विसर्जन केलं जातं. पुन्हा पुढील वर्षी तिचं मूर्ती नव्याने आणली जाते.

रुपाली भोसले

अभिनेत्री रुपाली भोसले हिने यावर्षी नवीन घर घेतलं आहे. आणि या नव्या घरात तिने पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे.

rupali bhosale
rupali bhosale esakal

सुबोध भावे

अभिनेता सुबोध भावे याच्या घरीही दरवर्षी प्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या माहेरी गणेशोत्सव साजरा केला जातो. तेव्हा सोनाली आणि तिचा भाऊ स्वतः गणपतीची मूर्ती तयार करतात आणि तिची पूजा करतात.

सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरीही दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन होतं.

अमित भानुशाली

अभिनेता अमित भानुशालीदेखील दरवर्षी गणपती बाप्पाचं स्वागत करतो.

amit bhanushali
amit bhanushali esakal

जुई गडकरी

अभिनेत्री जुई गडकरी हिच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत.

jui gadkari
jui gadkari esakal

याशिवाय अभिनेता शशांक केतकर, अंकिता लोखंडे, सुयश टिळक , सुशांत शेलार यांच्या घरीही गणरायाचं आगमनानं झालं आहे.

ganeshotsav 2024
कुणाची हुजरेगिरी न करता... नव्या घराबद्दल मागून बोलणाऱ्यांना प्रसाद ओकने सुनावलं, म्हणाला- लोकांना वाटतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.