Shah Rukh Khan: असं कोण वागतं रे! शाहरुखने वयस्कर व्यक्तीसोबत केलेली कृती बघून चाहत्यांना विश्वास बसेना; म्हणतात-

Shah Rukh Khan Viral Video: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने ७७ व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये केलेल्या एका कृतीने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे.
shahrukh khan
shahrukh khan esakal
Updated on

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान गेली कित्येक वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. भारतातच नाही तर परदेशातही त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्याने केलेली एक कृती पाहून त्याचे चाहतेही त्याच्यावर चिडले आहेत. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो एका वयस्कर व्यक्तीला धक्का देताना दिसतोय. त्यावरून आता चाहते त्याला सुनावत आहेत.

शाहरुख खानने ७७व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलच्या (77th locarno film festival) रेड कार्पेट हजेरी लावली होती. किंग खान ब्लेझर आणि पँटसह काळ्या शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत होता. त्याने त्याच्या लूकने चाहत्यांची मनं जिंकली. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीसाठी तसेच चाहत्यांसाठी हा अभिमानाचा क्षण होता कारण शाहरुखला स्वित्झर्लंडमध्ये पारडो अल्ला कॅरीरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मात्र त्यानंतर त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात शाहरुख रेड कार्पेटवर उभा आहे आणि पत्रकार त्याचे फोटो काढत आहेत. मात्र त्याच्या फोटोच्या फ्रेममध्ये एक वयस्कर व्यक्ती येत आहे. आणि शाहरुख वैतागून त्याला धक्का मारताना दिसतोय.

शाहरुखच्या या कृतीने सगळेच चकीत झाले आहेत. शाहरुख असं वागू शकतो यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. अनेक जण त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. तुझ्याकडून ही अपेक्षा नसल्याचं बोलत आहेत. तर काही नेटकरी शाहरुखने हे मस्करीमध्ये केल्याचं सांगत आहेत. तिथे नेमकं काय घडलं हे माहीत नसलं तरी नेटकऱ्यांना त्यांची ही कृती चांगलीच खटकली आहे. शाहरुखच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याचे 'पठाण', 'जवान', 'डंकी' हे चित्रपट चांगलेच गाजले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

shahrukh khan
Durga: 'आई तुळजाभवानी' नंतर कलर्स मराठीवर नव्या मालिकेची घोषणा; झीवरील अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.