खुर्चीवरून उठवलं, हात पकडला अन्... चक्क सासूबाईंसोबत डान्स करताना दिसला किंग खान; व्हिडिओ वायरल

Shah Rukh Khan Dance With Mother In Law: बॉलिवूडच्या किंग खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो त्याच्या सासूबाईंसोबत डान्स करताना दिसतोय.
shahrukh khan
shahrukh khan esakal
Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा अभिनेता शाहरुख खान याने आपल्या वागण्याने देखील चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याच्या वागण्याचं कायमच चाहते कौतुक करताना दिसतात. शाहरुख चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतो. बॉलिवूडचा किंग खान असलेल्या शाहरुखचा असाच एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय ज्यात तो चक्क आपल्या सासूबाईंसोबत डान्स करताना दिसतोय. हा व्हिडिओ दुबईतील एका पार्टीमधला आहे. ज्यात तो त्याच्या सासूबाई म्हणजेच गौरी खान हिच्या आई सविता छिब्बर यांच्यासोबत डान्स करताना दिसतोय.

शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबाने दुबईत एका पार्टीमध्ये हजेरी लावली होती. त सगळे आर्यन खान यायच्या ब्रँड इव्हेंटसाठी दुबईत आले होते. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात शाहरुख खान एका स्त्रीला खुर्चीवरून उठवून त्यांच्यासोबत डान्स करताना दिसतोय. त्या व्यक्ती गौरी खानच्या आई सविता छिब्बर आहेत. तर सविता देखील किंग खानसोबत डान्स करताना लाजताना दिसतायत.

यासोबत त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात शाहरुख त्याच्या लाडक्या लेकीसोबत डान्स करताना दिसतोय. शाहरुख या कार्यक्रमात मनमुराद डान्स करताना दिसतोय.

यासोबतच त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तो त्याच्या पठाण चित्रपटातील गाणं 'झुमे जो पठाण' वर थिरकताना दिसतोय. सोबतच यासगळ्यात तो जेव्हा गाण्याच्या हुक स्टेप करतो तेव्हा सगळे चाहते जोरजोरात ओरडताना दिसतायत. त्याचे हे दुबई इव्हेंटमधले फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

shahrukh khan
मेरे करण अर्जुन आएंगे नही, आगये! थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार शाहरुख सलमानचा 'करण-अर्जुन'; वाचा तारीख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.