'शाका लाका बूम बूम' मधील संजूचा पार पडला साखरपुडा; कोण आहे किंशुक वैद्यची होणारी पत्नी, 'पंचायत'शी आहे कनेक्शन

Kinshuk Vaidya Engagement : 'शाका लाका बूम बूम' मधील संजू आठवतोय? त्याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. कोण आहे त्याची पत्नी?
kinshuk vaidya engagement
kinshuk vaidya engagement esakal
Updated on

'शाका लाका बूम बूम' हा कार्यक्रम ९०च्या दशकात प्रचंड गाजला होता. कित्येक मुलांचा दिवस या कार्यक्रमाशिवाय पूर्ण होत नसे. आपल्या पेन्सिलने निरनिराळ्या गोष्टीचं चित्र काढून त्या खऱ्या करणारा संजू हा लहान मुलांचा आवडता होता. मात्र हाच संजू आता मोठा झाला आहे. ३३ वर्षाच्या संजूचा म्हणजेच अभिनेता किंशुक वैद्यचा नुकताच साखरपुडा झाला आहे. ही बातमी वाचून चाहतेही चकीत झाले आहेत. संजू इतका मोठा कधी झाला असं म्हणत चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

किंशुकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत अंगठी फ्लॉन्ट करताना दिसतोय. साखरपुड्यासाठी किंशुकने केलेला पेहरावही चांगलाच चर्चेत आहे. त्याने साखरपुड्यासाठी निळ्या रंगाचा कुर्ता - पायजमा घातला होता. तर होणाऱ्या पत्नीने निळ्या रंगाची साडी नेसली होती. चाहत्यांसोबत आता कलाकारही त्यांना साखरपुड्याच्या शुभेच्छा देत आहेत. शहीर शेख, दिशा परमार, हिबा नवाब आणि प्रियांका कांत यांनी त्याच्या पोस्टवर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. किंशुक यापूर्वी टीव्ही अभिनेत्री शिव्या पठानियाला डेट करत होता. पण २०२१ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.

कोण आहे किंशुकची होणारी पत्नी?

किंशुकच्या होणाऱ्या पत्नीचं नाव दीक्षा नागपाल आहे. ती एक लोकप्रिय डान्स कोरिओग्राफर आहे. दिक्षणे 'पंचायत २' मधील एका आयटम नंबरची कोरिओग्राफी केली होती. किंशुकबद्दल बोलायचं तर त्याने 'अलबेला' या कार्यक्रमात दिसला होता. त्यातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. त्यानंतर त्याने 'वो अपना स', 'एक रिश्ता साझेदारी का', 'जात ना पूछो प्रेम की' आणि कर्ण संगिनी' या मालिकांमध्ये दिसला होता.

kinshuk vaidya engagement
Nikki Tamboli: प्लास्टिक सर्जरीपूर्वी अशी दिसायची निकी तांबोळी; जुने फोटो पाहून ओळखूही येणार नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.