शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा यांना जुहूमधील घर खाली करण्याची नोटीस; पुण्यातील फार्म हाऊसदेखील केलं सील

Shilpa Shetty Raj Kundra Get Notice From Ed : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना त्यांचं राहतं घर खाली करण्याची नोटीस आली आहे. त्यांचं पुण्यातील फार्म हाऊसदेखील सील करण्यात आलं आहे.
shilpa shetty raj kundra
shilpa shetty raj kundra esakal
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा बिझनेसमन पती राज कुंद्रा यांना मुंबईतील जुहू भागात असलेला त्यांचा आलिशान बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली आहे. कथित क्रिप्टो ॲसेट पॉन्झी स्कीम प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्रीचा हा बंगला तसेच पवना तलावाजवळील फार्म हाऊस तात्पुरते जप्त केलं आहे. आता या जोडप्याला नोटीस बजावण्यात आली असून त्यांना बंगला खाली करण्यास सांगण्यात आलं आहे. या नोटिशीला शिल्पा आणि राज यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

१० दिवसांत घर रिकामं करण्याचे निर्देश

शिल्पा आणि राज यांनी वकील प्रशांत पाटील यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 27 सप्टेंबर 2024 रोजी या जोडप्याला ईडीकडून निष्कासनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे. या जोडप्याने त्याला 'अर्थहीन, बेपर्वा आणि मनमानी' म्हटले आहे. त्यांनी आपलं घर आणि कुटुंबाच्या जगण्याच्या अधिकाराचं रक्षण करावं, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. नोटीसमध्ये ईडीने मुंबईतील घर आणि पुण्यातील फार्म हाऊस १० दिवसांत रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयात दिलेल्या अर्जात शिल्पा आणि राज यांनी ईडीला तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की 2018 ते 2024 दरम्यान ईडीने पाठवलेल्या सर्व समन्सला या जोडप्याने उत्तर दिले आहे.

शिल्पा आणि राज यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे की, मनी लाँड्रिंगशी संबंधित पीएमएलएच्या तरतुदींनुसार या आदेशाला आव्हान दिले जाऊ शकते. मात्र आता त्या आदेशानंतर आम्हाला घर रिकामं करण्याची म्हणजेच बेदखल करण्याची नोटीस देण्यात येत आहे. आम्ही 15 वर्षांहून अधिक काळ या घरात राहत आहोत. ही मालमत्ता कथित 'गुन्ह्या'च्या कमाईने नव्हे तर 'कायदेशीर' कमावलेल्या पैशाने खरेदी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कथित पॉन्झी स्कीम प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर २०१८ पासून कारवाई सुरू आहे. ईडीने अमित भारद्वाज विरोधात गुन्हा दाखल केला तेव्हा दोघांचीही नावे या प्रकरणाशी जोडली गेली होती. या सेलिब्रिटी दाम्पत्याने इतर सहआरोपींसह बिटकॉइनच्या रूपाने 6 कोटींहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याच प्रकरणी आता त्यांची संपत्ती ईडीने जप्त करायचं ठरवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.