शिवाजी साटम यांना मांजरेकरांनी दिलेली बिग बॉस मराठीच्या होस्टिंगची ऑफर; पण या कारणामुळे अडलं घोडं

Shivaji Satam On Bigg Boss Marathi: लोकप्रिय मराठी अभिनेते शिवाजी साटम यांनी महेश मांजरेकर यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली आहे जेव्हा त्यांना बिग बॉस मराठीच्या होस्टिंगची ऑफर देण्यात आली होती.
shivaji satam
shivaji satam esakal
Updated on

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते शिवाजी साटम यांनी मराठीसोबतच हिंदीमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 'दे धक्का' मधून त्यांनी प्रेक्षकांना जोराचा धक्का दिला तर 'सीआयडी' मधुन त्यांनी प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. त्यांच्या अभिनयाची उंची फार मोठी आहे. मराठी सिनेसृष्टीत त्यांच्या आवाजाचा देखील एक धाक आहे. आता शिवाजी साटम यांनी बिग बॉस मराठीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. आपल्याला बिग बॉस मुळीच आवडत नाही आणि एकदा आपल्याला या कार्यक्रमाच्या होस्टिंगचीही ऑफर आली होती असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. नुकतीच त्यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बिग बॉसबद्दल सांगितलं आहे.

या मुलाखतीत बोलताना शिवाजी साटम म्हणाले, 'अगदी खरं सांगू का, बिग बॉस जेव्हा पहिल्यांदा सुरू झालं तेव्हा पण नाही पाहिलं. आणि आता मराठीत आल्यानंतर महेशच करत होता, तेव्हाही नाही पाहिला. फक्त आणि फक्त एकदाच पाहिला मराठीमध्ये, महेश होता म्हणून पाहिला. पूर्ण एपिसोड पाहिला तेव्हा माझं पूर्ण लक्ष केवळ आणि केवळ महेशवर होतं. कोण काय करतंय, कोण कामं करतंय यावर मुळीच नाही. ज्याने कुणी हा बिग बॉसचा प्रयोग केला आहे, तो बिग ब्रदर नावाचा कुणीतरी आहे. ठीक आहे त्यांच्या संस्कृतीमध्ये तो चालतो. इथे म्हणजे आपल्याच घरात येऊन आपल्याच वैयक्तिक आयुष्यात कुणीतरी बघतंय. मग तो ठरवणार आणि लोकांनी त्याच्यावर निर्णय द्यायचा. माझ्या घरात काय चालू आहे हे बघायचा आनंद त्यांना मिळतो. हा स्वभाव माझा नाहीये. त्यामुळे मी ते टाळतो.'

ते पुढे म्हणाले, 'जेव्हा महेश मांजरेकर आजारी होते तेव्हा त्यांना बिग बॉस होस्टिंगसाठी त्यांना विचारण्यात आलं. त्यावर शिवाजी साटम म्हणाले, 'हो त्याने मला विचारलेलं. पण मी त्याला म्हटलं मला हे जमणार नाही. मी के करणार नाही. मी हे करू शकणार नाही. तू इतकं छान करतोस. आपण जर अभिनेता म्हणून विचार केला ना तर मला खूप आवडायचं तो जे करायचा. तो खरोखर छान करायचा आणि गमती जमती पण काढायचा त्यातून. तो स्वतः ते बघायचा. तर मी त्याला नाही म्हटलं होतं. कारण म्हटलं मला जर स्वतःला ते पाहायला आवडत नसेल तर मी ते करूच शकणार नाही. तुझा प्रॉब्लेम असला तर तू दुसरा बघ कुणीतरी. त्यानंतर मला वाटतं सिद्धार्थला आणलं होतं.'

shivaji satam
तर वोटिंग का घेतली? पंढरीनाथच्या एव्हिक्शनवर नेटकरी संतापले; म्हणाले- त्या सदस्याला वाचवण्यासाठी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.