नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाआधीच्या विधींना उत्साहात सुरुवात; फोटो पाहून नेटकरीही करतायत कौतुक

Shobhita Dhulipala Naga Chaitanya Pre- Wedding Ceremony Photos: शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, ज्यासाठीचे विधी सुरू झाले आहेत. शोभिताने तिच्या लग्नाआधीचे फोटो शेअर केले आहेत.
shobhita dhulipala
shobhita dhulipala esakal
Updated on

दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि अभिनेता नागा चैतन्य लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांनी ऑगस्ट 2024 मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. काहींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता तर काहींनी टीका केली होती. आता त्यांच्या लग्नाआधीच्या काही प्रथांना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने तिच्या लग्नाआधीच्या सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने गोधूमा राय पसुपू विधीचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती खऱ्या दक्षिण भारतीय पद्धतीने विधी करताना दिसत आहे.

शोभिता धुलिपालाच्या लग्नाचे विधी सुरू

शोभिता धुलिपालाने इंस्टाग्रामवर 10-12 फोटो शेअर केले आहेत. तिने या विधीसाठी सिल्कची गुलाबी साडी नेसली होती. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत. हॉलमध्ये चमेलीच्या फुलांच्या माळा आहेत. सगळीकडे फुलाची सजावट करण्यात आली आहे. एका फोटोमध्ये तो उखळात काहीतरी कुटताना दिसत आहे तर एकात छोट्याश्या जात्यावर दळण करताना दिसतेय. तिने केसात गजरा माळला असून अगदी साधी आणि सुंदर दिसत आहे. ती कुटुंबातील इतर सदस्यांसोबत विधी करताना दिसत आहे.

शोभिताने या फोटोंसोबत कॅप्शन लिहिलं, 'गोधुमा राय पसुपू विधी, आणि त्याची अखेर सुरुवात झाली आहे.' अभिनेत्रीच्या या पोस्टवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले की, 'नेहमी सौभाग्यवती रहा.' तर काहींनी तिच्या साधेपणाचे आणि सौंदर्याचे कौतुक केलं.

नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांचं लग्न

नागा चैतन्य शोभिता धुलीपालाशी दुसरं लग्न करणार आहे. 2017 मध्ये त्यांने पहिलं लग्न सामंथा रुथ प्रभूशी केलं पण 2021 मध्ये ते वेगळे झाले. नंतर नागा चैतन्यने एका मुलाखतीत सांगितलं की घटस्फोटानंतर ती डिप्रेशनची शिकार झाली होती. सोबतच आपण बाळाची देखील प्लॅनिंग करत होतो मात्र तसं होऊ शकलं नाही.

shobhita dhulipala
Aishwarya Rai And Abhishek Bachchan: घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच ऐश्वर्या-अभिषेकने केलं लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन; फोटो चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.