Siddharth Jadhav: आम्ही एकत्रच! सिद्धार्थ जाधवच्या घटस्फोटाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; तो व्हिडिओ ठरला कारण

Siddharth Jadhav With Wife Trupti: लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या वैयक्तिक आयुष्यात सारंकाही आलबेल असल्याचं दिसून आल्याने आता चाहते आनंदी झाले आहेत.
siddharth jadhav
siddharth jadhav esakal
Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्याने आपल्या वागण्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. मात्र काही वर्षांपूर्वी सिद्धार्थचं वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर चर्चेत होतं. त्याच्या वैवाहिक आयुष्यात सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. त्याच्या एका व्हिडीओवरून तो आणि त्याची पत्नी एकत्र असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही आनंदी झाले आहेत.

एकत्र असण्यावर शिक्कामोर्तब

२०२२ मध्ये सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती एकत्र राहत नसल्याच्या चर्चा होत्या. काही कौटुंबिक कारणांमुळे ते वेगवेगळे राहत असल्याचं बोललं जात होतं. तर त्या दोघांनीही एकमेकांसाठी आणि एकमेकांसोबत एकही पोस्ट शेअर केली नव्हती. त्यांचा एकत्रित असा एकही फोटो सोशल मीडियावर नव्हता त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचा अंदाज लावला होत. मात्र आता सिद्धार्थ आणि तृप्ती एकत्र असण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्याला एक व्हिडिओ कारण ठरलं आहे. सिद्धार्थला त्याच्या कामासाठी स्टार प्रवाह वाहिनीकडून एक आलिशान गाडी भेट देण्यात आली. त्या गाडीची पूजा करतानाचा एक व्हिडिओ सिद्धार्थने शेअर केला. या व्हिडिओत सिद्धार्थची पत्नी तृप्ती गाडीची पूजा करताना दिसली. यात त्याच्या दोन्ही मुलीही होत्या.

तृप्तीला पाहून चाहतेही आनंदी झाले आहेत. सिद्धार्थच्या कठीण काळात तृप्तीने पत्नी म्हणून त्याची खंबीरपणे साथ दिली. ती त्याच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभी होती. काही वर्ष डेट केल्यानंतर तृप्ती आणि सिद्धार्थ यांनी लग्नगाठ बांधली होती. आता त्यांना एकत्र पाहून चाहते आनंदी झालेत आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या आनंदी कुटुंबाला पाहून चाहतेही सुखावले आहेत.

siddharth jadhav
Lakhat Ek Aamcha Dada: जो विषय घराघरात लपवला जातो त्याला वाहिनीने घातला हात; मालिकेतील मासिक पाळीच्या भागावर नेटकरी म्हणतात-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.