प्रदर्शनाआधीच भिडले 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३'; टी सिरीजची CCI कडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

Singham Again And Bhool Bhulaiyaa Fight : दिवाळीच्या पहिल्या दिवशी 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' हे दोन्ही चित्रपट रिलीज होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यात भांडण सुरू झालं आहे.
bhool bhulaiyaa singham again
bhool bhulaiyaa singham again esakal
Updated on

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याचा 'सिंघम अगेन' आणि अभिनेता कार्तिक आर्यन याचा 'भूल भुलैया ३' हे दोन्ही चित्रपट नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. २०२४ हा मोठा क्लॅश मानला जातोय. दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सर बोर्डाकडे क्लिअरन्स सर्टिफिकेट जमा केलं आहे. मात्र अशातच आता या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रदर्शनाआधीच जुंपली आहे. हे दोन्ही चित्रपट आता स्क्रीन्ससाठी भांडताना दिसत आहेत. 'भूल भुलैया 3'चे निर्माते टी-सीरीजने रोहित शेट्टी आणि 'सिंघम अगेन'च्या निर्मात्यांवर चुकीचं वागत असल्याचा आरोप केला आहे आणि भारतीय स्पर्धा आयोगाकडे (CCI) संपर्क साधला आहे. वाचा नेमकं हे काय प्रकरण आहे.

'भूल भुलैया 3' चं दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे. तर टी-सीरीजच्या बॅनरखाली भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि मुरानी खेतानी हे प्रोड्यूस करत आहेत. दुसरीकडे, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन'ची निर्मिती रोहित, अजय देवगण आणि ज्योती देशपांडे करत आहेत. अशात आत टी सिरीजने आरोप केला आहे की 'सिंघम अगेन' साठी रोहित शेट्टी जास्तीत जास्त स्क्रीन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्या महिन्यानुसार, दोन्ही चित्रपटांना सारख्याच स्क्रीन मिळायला हव्या.

थिएटरमध्ये दिसणार फक्त 'सिंघम अगेन'?

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, 'सिंघम अगेन'चे वितरक पीव्हीआर पिक्चर्सने त्यांच्या 'पीव्हीआर- आयनॉक्स' थिएटरमधील ६०% हून अधिक शो 'सिंघम अगेन' साठी राखीव ठेवले आहेत. यामध्ये प्राइम टाइम शोचाही समावेश आहे. याशिवाय 'सिंघम अगेन'चे शोही काही सिंगल-स्क्रीन थिएटर्समध्ये प्रदर्शित होत आहेत. तर 'भूल भुलैया 3' सकाळीच दाखवावा, असेही त्यांना सांगण्यात आलंय. यासगळ्या प्रकारामुळे 'भूल भुलैया ३' च्या शो वर परिणाम होणार हे निश्चित.

काय म्हणाले गिरीश जोहर?

या सगळ्या प्रकरणावर CCI चा निर्णय येणं बाकी असलं तरी फिल्ममेकर आणि ट्रेड ऍनालिस्ट गिरीश जोहर म्हणाले, 'इंडस्ट्रीमध्ये क्लॅश काही नवीन गोष्ट नाही मात्र हा सगळं आखेल दोन दिवस चालतो. नंतर येतो कन्टेन्ट . तुमचा चित्रपट चांगला असेल तर त्याला प्रेक्षक गर्दी करतात आणि सिनेमागृहांना तो चित्रपट लावावाच लागतो.

bhool bhulaiyaa singham again
अविनाश आणि ऐश्वर्या नारकरांचं नवं घर; दिवाळीच्या आधी दिली आनंदाची बातमी, व्हिडिओमधून शेअर केली खास झलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.