लोकप्रिय मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्नेहल तिच्या 'फुलवंती' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच स्नेहलने या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. तीची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मध्यंतरी स्नेहलने तिच्या घरात चूल बनवल्याचे फोटो शेअर केले होते. आता या मुलाखतीत स्नेहलने मुंबईच्या घरात चूल का बनवली याचं कारण सांगितलंय.
स्नेहलने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना स्नेहल म्हणाली, 'मला लहानपणापासून गावाकडे गेल्यावर तिथल्या स्वयंपाकघराचा वेगळा वास असतो. त्यात शेणाचा, चुलीचा वास असतो. एक वेगळंच वातावरण असतं. माहौल असतो एकदम मस्त. त्या वासानं मंत्रमुग्ध व्हायला होतं. तर तो वास आहे ना, त्या शेणाशी, मातीच्या चुलीशी असलेला बंध याची शहरामध्ये मला कुठेतरी कमतरता वाटत होती. मला ते रोज हवं होतं, म्हणून मी ठरवलं की, मी स्वत: आपला शेणाने सारवलेला ओटा बांधावा. त्याच्यावर एक चूल तयार करावी आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा त्यावर स्वयंपाक करावा. त्या वासाचा परत एकदा अनुभव घ्यावा.'
ती पुढे म्हणाले, 'अनेकदा ही तक्रार असू शकते की, इच्छा असूनसुद्धा फ्लॅटमध्ये कशी काय चूल मांडायची? तर तुम्ही अगदीच मांडू शकता. जरी धूर झाला तरी आता चिमणी असते, त्याच्यातून धूर बाहेर जातो. तुमची तिथे गॅसची शेगडी असेल, तर मी जशी चूल गॅलरीमध्ये बांधलेली आहे, तशी चूल तुम्ही गॅलरीमध्ये करू शकता. लाकडं जर वाळलेली असतील, तर धूर होत नाही. चुलीवरच्या जेवणाला एक वेगळीच चव येते. म्हणून मी मुंबईतसुद्धा चूल मांडली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.