Bollywood News: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याला देण्यात येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. लॉरेन्स बिष्णोई त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय. मात्र तरीही सलमान त्याची शूटिंगची कामं करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने लॉरेन्स बिष्णोईला मेसेज करत त्याची माफी मागितली होती. सलमानची त्यांची माफी मागायला तयार आहे असं म्हटलं होतं. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत सोमीने सलमानपेक्षा लॉरेन्स बरा असं म्हटलंय. सलमानने त्याच्या गर्लफ्रेंड्सना खूप वाईट वागणूक दिली होती आणि त्याने ऐश्वर्या रायच्या हाताचं हाड मोडलं होतं असंही ती म्हणाली आहे.
IANS सोबत बोलताना सोमी म्हणाली, 'सलमान त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्स संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ यांच्यासोबत चांगला वागतो पण माझ्यासोबत चांगला वागत नाही कारण तो माझ्यासोबत जसा वागला तसा कुणासोबतही वागला नाही. सलमानने मला जेवढं छळलं तेवढा त्रास त्याने संगीता आणि कतरिनाला दिला नाही. त्याने ऐश्वर्याला खूप वाईट वागणूक दिली. मला वाटतं की त्याने ऐश्वर्याच्या खांद्याचं हाड तोडलं होतं. त्याने कतरिनाससोबत काय केलं माहीत नाही.'
सोनीने सलमानची तुलना थेट लॉरेन्स बिष्णोई सोबत केली. ती म्हणाली, 'त्याने माझ्यासोबत जे केलं, तो माझ्यासोबत तो जे वागला त्यावरून लॉरेन्स बिष्णोई त्याच्यापेक्षा चांगला आहे असं मी नक्कीच म्हणू शकते. सलमानने मला एकदा इतकी मारहाण केली होती की माझ्या नोकराने दरवाजा ठोकत त्याला मला मारू नका अशी विनंती केली होती. एकदा माझी खूप पाठ दुखत होती. माझी ती अवस्था पाहून तब्बू रडली पण सलमान मला पाहायलाही आला नाही. मी सलमानसोबतच्या माझ्या नात्यावर एक पुस्तक लिहितेय. त्यात मी सगळं सविस्तर लिहिणार आहे.' सोमी स्वतःची एनजीओ 'नो मोअर टीयर्स' चालवते आणि मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचाराच्या बळींना मदत करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.