Siddharth Jadhav: काय सांगता! सिद्धार्थ जाधवला स्टार प्रवाह वाहिनीने भेट दिली आलिशान कार; पोस्ट करत सांगितलं कारण

Siddharth Jadhav Get Car From Star Pravah Channel: लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या मेहनतीचं आज चीज झालं आहे. त्याला वाहिनीतर्फे एक गाडी भेट देण्यात आली आहे.
siddharth jadhav
siddharth jadhavesakal
Updated on

Siddharth Jadhav New Car: कलाकार होण्यासाठी दिसणं नाही तर अभिनय येणं महत्वाचं असतं हे वारंवार सिद्ध करत मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीला आपली दाखल घ्यायला भाग पाडलं. त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं. मराठीसोबतच हिंदीमध्येही तो झळकला. आता त्याच्या या मेहनतीचं चीज होताना दिसतंय. स्टार प्रवाह वाहिनीने त्याला थेट आलिशान गाडी भेट दिली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. वाहिनीचा धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून त्याला ही गाडी भेट मिळाली आहे.

सिद्धार्थ गेली काही वर्ष स्टार प्रवाहावरील 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाचा होस्ट म्हणून काम पाहतोय. त्याच्या कामाचं कौतुक म्हणून त्याला ही गाडी देण्यात आली आहे. त्याने या गदाइची पूजा करतानाचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं, '😇न मागताच मिळाले आज खूप काही. स्टार प्रवाह, सतीश राजवाडे, यांचे खूप खूप आभार, मराठी टेलिव्हीजन इतिहासामधला मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी फिलिंग. कारण खूप वर्षांपूर्वी "इंडियन आयडॉल" च्या फायनल नंतर अभिजित सावंतला होंडा सिटी मिळाली होती. आणि ते बघून खूप आनंद झाला होता.'

त्याने पुढे लिहिलं, 'आणि आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं १ चॅनेल वर "आता होऊ दे धिंगाणा" सारखा शो होस्ट करायला मिळणं आणि त्याच शो वर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि त्याची जी काय पोचपावती म्हणून, धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे. खुप मस्त वाटतंय. आता होऊ दे धिंगाणा..' त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहते त्याचा आनंद पाहून खूप खुश आहेत. या व्हिडिओमध्ये त्याच्या घरातील मंडळी पूजा करताना दिसतायत. तर तो मुलीसोबत केक कापताना दिसतोय.

siddharth jadhav
R R Patil: ज्या राज्याने तुला मोठं केलं त्याला... जेव्हा आर आर आबांनी अमिताभ बच्चन यांना झापलेलं; वाचा तो किस्सा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.