'उदे गं अंबे' मालिकेसाठी ठरला नवरात्रीचा मुहूर्त! 'या' दिवशी येणार भेटीला तर 'ही' लोकप्रिय मालिका घेणार निरोप

Star Pravah New Serial Ude Ga Ambe: साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास सांगणारी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
udhe ga ambe
udhe ga ambe esakal
Updated on

New Serial Ude Ga Ambe Release Date: पुढील महिन्याभरात छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात स्टार प्रवाह, कलर्स वाहिनी आणि झी वाहिनीचा समावेश आहे. स्टार प्रवाहवर लवकरच 'उदे गं अंबे' ही मालिका सुरू होणार आहे. या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व व इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन मिळून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. यापूर्वी मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर ही मालिका नेमकी कधी सुरू होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.आता या मालिकेची तारीख आणि वेळ दोन्ही समोर आले आहेत.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीची कुलदेवता म्हणून पूजा केली जाते. ही आदिशक्ती आईप्रमाणे आपल्या कुटुंबाचं, भक्तांचं रक्षण करते. ‘उदे गं अंबे’ या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे भगवान शिवशंकर यांची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर तो ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकणार आहे. तसेच देवदत्त नागेबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री मयुरी कापडणे झळकणार आहे. ही नवी मालिका ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता ही नवीन मालिका स्टार प्रवाह ( Star Pravah ) वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.

ही मालिका घेणार निरोप

तर स्टार प्रवाहवर सुरू असलेली 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय. त्यासोबतच स्टार प्रवाहवरील आणखी दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्याजागी आणखी दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

udhe ga ambe
Malaika Arora Father Funeral: जन्मदात्याला निरोप देताना कोपऱ्यात उभ्या मलायकाला अश्रू अनावर; अंत्यदर्शनाला कलाकारांची गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.