झी मराठी, स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी या वाहिन्यांमध्ये टीआरपीची जोरदार टक्कर दिसून येते. यामुळेच वाहिन्या सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यात्या तीनही वाहिन्यांवर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कलर्स मराठीने यापूर्वी एका मालिकेची घोषणा केली होती. नुकताच 'आई तुळजाभवानी' या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र त्याही पुढे जात स्टार प्रवाह एक दोन नव्हे तर तीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यातील दोन मालिकांचे प्रोमो नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहेत.
स्टार प्रवाहच्या 'गणेशोत्सव २०२४' दरम्यान दोन नव्या मालिकांचे प्रोमो प्रदर्शित करण्यात आले. यातील पहिली मालिका आहे 'उदे गं अंबे' या मालिकेत देवीच्या साडेतीन शक्तिपीठांची माहिती दाखवण्यात येणार आहे. या पौराणिक मालिकेत अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री मयुरी कापडणे हे दोघे भगवान शंकर आणि पार्वतीच्या रूपात दिसणार आहेत. तर यानंतर आणखी एका मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेचं नाव आहे 'आई बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम यांची मुख्य भूमिका आहे. या मालिकेचा विषय अतिशय वेगळा आहे.
या दोन मालिकांसोबत स्टार प्रवाह तिसरी मालिका देखील सुरू करणार आहे. या मालिकेचं नाव जाहीर करण्यात आलं नसलं तरी त्यात अभिनेत्री मृणाल दुसानिस, शर्वरी जोग, ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेचा प्रोमोदेखील लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र आता स्टार प्रवाह इतर वाहिन्यांच्या विरोधात हुकमाचे एक्के काढले आहेत हे मात्र नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.