तब्बल ५ वर्षांनी स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; अभिनेत्यानेच पोस्ट करत सांगितलं, म्हणाला- आता लवकरच...

Star Pravah Popular Serial Going Off Air: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका आता निरोप घेणार आहे. अभिनेत्याने स्वतः पोस्ट करत याबद्दल सांगितलं आहे.
star pravah serial off air
star pravah serial off airesakal
Updated on

छोट्या पडद्यावर कितीही लोकप्रिय ठरल्या तरी कधीना कधी त्यांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावाच लागतो. काही कालावधीसाठी सुरु होणाऱ्या या मालिका कधी प्रेक्षकांच्या आवडत्या होतात कळतंच नाही. या मालिकांमधले कलाकार प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागतात. या कलाकारांना प्रेक्षक आपल्या घरातील सदस्य असल्यासारखे मानतात. मात्र प्रत्येक कथानकाचा शेवट हा ठरलेला असतो. आता मराठी वाहिन्यांवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तब्बल ५ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका आहे 'आई कुठे काय करते'. मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

डिसेंबर २०१९मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचा प्रवास आता थांबणार आहे. त्याजागी निवेदिता सराफ यांची नवी मालिका 'आई बाबा रिटायर होत आहेत' घेणार आहे. दुपारी २. ३० वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. मिलिंद यांनी आता आपल्या सहकलाकार आणि तंत्रज्ञ यांचा निरोप घेणारी पोस्ट शेअर केली आहे. मिलिंद यांनी लिहिलं, 'मी मिलिंद गवळी , स्टार प्रवाह परिवार आणि Director's Kut Prodn, कडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय शांतीपूर्ण आरोग्यदायी यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

|

आमची "आई कुठे काय करते" ही स्टारप्रवाह वरची मालिका आपला लवकरच निरोप घेणारआहे. डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ हा या मालिकेचा प्रवास होता.' 'या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊनस, आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंग ला सुरुवात , आणि लॉकडाऊन च्या काळात स्टारप्रवाहने "आईकुठेकायकरते" चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती त्यांनी पुन्हा सिरीयल पाहिली, ती इतकी भावली की अक्षर: या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं.'

'आमच्यावर भरभरून प्रेम करत राहिले, आमचे निर्माते राजनजी शाही आणि स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, स्टार प्रवाहने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन, मग ते "होऊ दे धिंगाणा" किंवा पुरस्कार सोहळ्यां मध्ये आमचं कौतुक करून जाहिरात ही केली.'

'DKP चे विवेक भाई, आरिफ भाई रणजीत जी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो, त्या वास्तूमध्ये आम्ही 45 ते 50 वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोटरूम,पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरूम्स, वेगवेगळी घर, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं, त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये, असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉप वरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशन वर केले, आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही.'

'नमिता वर्तक यां ची कथा पटकथा खूप भारी होती, या सिरीयलचे संवाद छान असायचे, प्रेक्षक कान देऊन ऐकायचे, ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर, मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते, दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल, भट्टी जमलीच होती, आणि विशेष म्हणजे कलाकार, या सिरीयल मध्ये एकापेक्षा एक कलाकार होते, आपल्या आपल्या पात्रात चपख्खल बसलेले, आप्पा, कांचनआई, अरुंधती, संजना, अभी, यश,इशा,अनघा,विमल, शेखर विशाखा आरोही गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्याताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते. मी हा सर्वांचा आभारी आहे.' त्यावर नेटकऱ्यांनी देखील आम्हाला तुमची आठवण येईल अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

star pravah serial off air
म्हणून स्नेहल तरडेंनी मुंबईच्या घरातच बनवली चूल; स्वतः कारण सांगत म्हणाल्या- गावाकडून आल्यावर मला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.