Stree 2 Box Office Day १: 'स्त्री २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मोडला 'गदर २', टायगर ३'चा रेकॉर्ड, वाचा कमाई

Stree 2 Box Office Collection 1 Day Opening: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी आपली जादू दाखवली आहे.
stree 2  box office
stree 2 box office esakal
Updated on

Shraddha Kapoor Rajkumar Rao Stree 2 Movie Box Office : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री २' काळ १५ ऑगस्ट २०२४ रोजी सगळीकडे प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या आणि आता त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कॉमेडी हॉरर चित्रपटाने आता सगळ्यांना चकीत केलं आहे. पहिल्याच दिवशी 'स्त्री २' ने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट या वर्षीच्या बम्पर ओपनिंग चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तर या चित्रपटाने गदर २ आणि टायगर ३ चा रेकॉर्डही मोडला आहे.

१४ ऑगस्ट रोजी चित्रपटांचे पेड प्रिव्हयु दाखवले गेले. त्यात चित्रपटाने ८ कोटींची कामाची केली होती. आता पहिल्या दिवशीच या चित्रपटाने बम्पर ओपनिंग करत ४६ कोटींची कमाई केली आहे. स्त्री 2 ने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये 'फायटर' आणि 'कल्की 2898 एडी'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईलाच मागे टाकले नाही तर सलमानच्या 'टायगर 3'लाही मागे टाकलं. यावर्षी आतापर्यंत हिंदीमध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम 'फायटर' आणि 'कल्की 2898 एडी'च्या नावावर होता. या दोघांनी 22.50 कोटींची कमाई केली होती.तर 'स्त्री 2' ने आगाऊ बुकिंगमध्येच यापेक्षा जास्त (23.36 कोटी) कमाई केली होती.

'स्त्री 2' ची दमदार ओपनिंग होईल असा अंदाज वर्तवला जात होता, पण एवढी मोठी ओपनिंग होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. 'स्त्री 2' हा 2024 मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. त्यामुळे एकूण या चित्रपटाची कमाई बघितली तर ती ५४ कोटी ३५ लाखांच्या घरात आहे. हे तर सुरुवातीचे आकडे आहेत. पहिल्या चार दिवसातच हा चित्रपट १०० कोटी पार करणार असा अंदाज लावला जातोय.

stree 2  box office
Stree 2 Cameo: 'स्त्री २' मध्ये मोठा ट्विस्ट; चित्रपटात दिसला सुपरस्टार अभिनेता, नेटकरीही झाले चकीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.