Stree 2 Total Box Office Collection: अमर कौशिक यांच्या 'स्त्री 2' या चित्रपटाने प्रदर्शनानंतर मोठा धुमाकूळ घातला आहे. १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक रेकॉर्ड केले होते आणि आता दुसऱ्या दिवशीही त्याचा डंका वाजत आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पाचवा भारतीय चित्रपट ठरलेल्या 'स्त्री 2'ने दुसऱ्या दिवशी 30 कोटींची कमाई केली आहे. 16 ऑगस्ट हा वर्किंग डे असल्याने या दिवशी कमाई निश्चितच कमी झाली, परंतु त्याचा लोकप्रियतेवर फारसा फरक पडलेला नाही. तर जगभरात चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत १०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. मात्र या चित्रपटाचं बजेट किती होतं हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'स्त्री 2' ची कमाई दुसऱ्या दिवशी सुमारे -42% नी घसरली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 51.80 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी शनिवारी 30 कोटी रुपयांची कमाई केली. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने देशात 90.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये 14 ऑगस्टच्या रात्री रिलीजच्या आधीच्या पेड प्रिव्हयुमधून मिळालेल्या 8.50 कोटी रुपयांच्या कमाईचाही समावेश आहे. एकूणच या चित्रपटाने ९० कोटींची कमाई केली. तर संपूर्ण जगभरात चित्रपटाने ११२ कोटींची कमाई केली आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की हा चित्रपट केवळ ५० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे.
'स्त्री 2' हा 2018 च्या 'स्त्री' चित्रपटाचा सीक्वल आहे, ज्यामध्ये श्रद्धा कपूरसोबत, राजकुमार राव, विजय राज, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि तमन्ना भाटिया देखील आहेत. प्रीक्वलमध्ये चंदेरी गाव स्त्रीच्या दहशतीने हैराण झाले होते, तर ‘स्त्री २’मध्ये आता सरकटेची दहशत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला असून ते कथेपासून अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक करताना दिसत आहेत. अर्थात 'स्त्री 2'ला वर्ड ऑफ माऊथ पब्लिसिटीचा फायदाही मिळत आहे, पण कथा हिचं खरी चित्रपटाची ताकद आहे हे पुन्हा सिद्ध झालं आहे. कथेत ताकद नसेल, तर मोठा स्टारही ती वाचवू शकत नाही. 'स्त्री 2' सोबत रिलीज झालेले 'वेदा' आणि 'खेल खेल में' बॉक्स ऑफिसवर फिके पडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.