Stree 2 Box Office: श्रद्धाच्या 'स्त्री २'ची घौडदौड सुरूच! मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड, एकूण किती केली कमाई?

Stree 2 Box Office Collection: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २' ने पहिल्या आठवड्यातच अनेक बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत.
stree 2
stree 2 esakal
Updated on

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' ने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. मॅडॉक प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेला 'स्त्री २' सध्या सगळ्या जगात छप्परफ़ाड कमाई करतोय. चंदेरी गावावर आलेलं हे संकट कोण आणि कसं दूर करतं हे पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. तर २३ ऑगस्ट रोजीही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने १६ कोटी ५० लाखांची कमाई केली. त्यामुळे आता एकूण कलेक्शनच्या जोरावर या चित्रपटाने पाच बड्या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहेत.

किती केली कमाई?

'स्त्री २' ने संपूर्ण देशभरात ३४२ कोटींची कमाई केली आहे. तर संपूर्ण जगभरात ५९ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 2018 मध्ये आलेल्या 'स्त्री' चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'स्त्री 2' हा 400 कोटींचा टप्पा गाठणारा सर्वात वेगवान बॉलिवूड चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने पाच बड्या चित्रपटांचे सगळ्यात वेगवान ४०० कोटी कमावण्याचा रेकॉर्ड तोडला आहे. यात शाहरुख खानचा 'जवान', रणबीर कपूरचा 'ऍनिमल', SRKचा 'पठाण' , सनी देओलचा 'गदर 2' आणि प्रभासचा 'बाहुबली 2' यांचा समावेश आहे.

श्रद्धाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

'स्त्री २' हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी श्रद्धाच्या 'साहो' चित्रपटाने सगळ्यात जास्त कमाई केली होती. या चित्रपटाने ३१० कोटींची कमाई केली होती. आता 'स्त्री २' ने ३४५ कोटींची कमाई केली आहे. अजूनही या चित्रपटाची विजयी घौडदौड सुरू आहे. आता हा चित्रपट ५०० कोटी कमावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

stree 2
'शाका लाका बूम बूम' मधील संजूचा पार पडला साखरपुडा; कोण आहे किंशुक वैद्यची होणारी पत्नी, 'पंचायत'शी आहे कनेक्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.