Stree 2 Cameo: 'स्त्री २' मध्ये मोठा ट्विस्ट; चित्रपटात दिसला सुपरस्टार अभिनेता, नेटकरीही झाले चकीत

Superstar Actor Cameo In Stree 2: श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' ची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. त्यात चित्रपटात आणखी एका अभिनेत्याचा कॅमिओ दाखवण्यात आला आहे.
stree 2
stree 2esakal
Updated on

Rajkumar Rao Shraddha Kapoor Stree 2 Update: 'स्त्री २' या चित्रपटाची प्रेक्षक कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होते. 'स्त्री' या चित्रपटाने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं होतं. राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता त्याच्या पुढील कथा जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. १४ ऑगस्ट २०२४ रोजी 'स्त्री २' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं चित्र आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होताना दिसतंय. चित्रपटाच्या कथेचं देखील कौतुक होत आहे. मात्र अशातच चित्रपटातील आणखी एका गोष्टीबद्दल चर्चा रंगलीये ती म्हणजे 'स्त्री २' मध्ये एका लोकप्रिय अभिनेत्याचा दमदार कॅमिओ दाखवण्यात आला आहे.

चाहते 'स्त्री २' ची उत्सुकतेने वाट पाहत होते. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अभिषेक बनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं तर जिंकली आहेतच. सोबतच चित्रपटात आणखी एका अभिनेत्याला पाहून चाहते चकीत झाले आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अक्षय कुमार आहे. त्याला पाहून नेटकऱ्यांनी चित्रपटगृहात एकच कल्ला करायला सुरुवात केली. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अक्षय कुमार चित्रपटाच्या पोस्ट क्रेडीट सीनमध्ये दाखवण्यात येतो. आणि प्रेक्षकांच्या अंदाजानुसार आता अक्षय 'स्त्री ३' मध्ये दिसणार आहे. प्रेक्षक अक्षयला 'स्त्री २' चा थानोस म्हणत आहेत. त्याला पाहून चाहते प्रचंड खुश झाले आहेत. आता 'स्त्री ३' येणार यात कोणतीही शंका नाही.

स्त्री मध्ये एक स्त्री यायची जी चंदेरी गावातील पुरुषांना घेऊन जायची. मात्र नंतर स्त्री या गावाची रक्षक बनली. आता चंदेरीमध्ये सरकटेची दहशत आहे. 'स्त्री २' मधील कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होतंय. आता प्रेक्षक 'स्त्री ३' साठीही सज्ज झाले आहेत.

stree 2
Bharat Jadhav: पत्नीने माझ्यासाठी काय केलं? भरत जाधव यांनी दिलं उत्तर, म्हणतात- ती नसती तर कदाचित...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.