सध्या सगळीकडे 'स्त्री २' ची जोरदार चर्चा आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' ने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज आहे. या चित्रपटाचं खास आकर्षण ठरली ती स्त्री म्हणजेच श्रद्धा कपूरची वेणी आणि सरकटा. सरकटाला पाहून प्रेक्षकांच्या अंगावरही काटा आला. मात्र चंदेरी गावातील मुलींना पळवून नेणारा हा सरकटा यापूर्वी 'अमिताभ बच्चन आणि प्रभास यांच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटातही दिसला होता हे तुम्हाला ठाऊक आहे का?
हो तुम्ही वाचलंत ते खरं आहे. अमिताभ, प्रभास आणि दीपिका पादुकोण यांच्या 'कल्की'मध्येही सरकटा दिसला आहे. 'स्त्री २' मध्ये सरकटा साकारणारे अभिनेता सुनील कुमार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुनील कुमार यांनी 'कल्की' मध्ये अमिताभ बच्चन यांच्या बॉडी डबलची भूमिका केली आहे. त्यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे. याबद्दल बोलताना सुनील कुमार म्हणाले,'मी 'कल्की २८९८ एडी' मध्ये अमिताभ सरांच्या बॉडी डबलची भूमिका केली आहे. जेव्हा मला यासाठी विचारणा झाली तेव्हा मी आणि माझे कुटुंबीय खूप खुश झालो. आम्ही सगळेच अमिताभ यांचे फॅन आहोत. ती शूटिंग खूप मजेशीर होती. कारण मला खूप स्टंट करायला मिळाले.'
त्याने या मुलाखतीत अमिताभ यांच्यासोबतची पहिली भेटही सांगितली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'सेटवर माझा पहिला दिवस होता आणि जेव्हा मी सीनमध्ये प्रवेश केला तेव्हा जवळच अमिताभ सर आणि प्रभास सर बसले होते. मी हार्नेस घालून माझ्या ॲक्शन सीक्वेन्ससाठी तयार होतो, तेव्हा अमित सरांनी माझ्याकडे पाहिले. ते माझ्या जवळ आले आणि कॅमेरा पर्सनला फोटो काढायला सांगितला. ते हसत म्हणाले, सगळे मला लंबू म्हणतात, आज मला माझ्यापेक्षा उंच कोणीतरी भेटलं आहे.' सुनील कुमार यांनी कल्की मध्ये अमिताभ यांच्यावरचे सगळे सीन केले आहेत.
सुनील कुमार हे जम्मू काश्मीर मधील ७. ७ उंचीचे कॉन्स्टेबल आहेत. त्यांच्या उंचीमुळे त्यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून जाहिरातींसाठी विचारणा होऊ लागली. त्यानंतर त्यांना कल्कीसाठी विचारणा झाली. त्यानंतर त्यांना स्त्री २ साठी विचारणा करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.