Stree 2 Twitter Review: पैसा वसूल की... कसा आहे श्रद्धाचा 'स्त्री २'? तिकीट काढण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू

Stree 2 Public Review Out: राजकुमार राव, श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' ने प्रेक्षकांची मनं जिंकली कि नाही? पाहायला जाण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू.
stree 2
stree 2esakal
Updated on

Stree 2 Review: बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा गर्दी पाहायला मिळतेय त्याचं कारण म्हणजे आज १५ ऑगस्ट २०२४ रोजी 'स्त्री २', 'खेल खेल मै' आणि 'वेदा' असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडला आशेचा किरण दिसू लागलाय. त्याचं कारण म्हणजे या तीन चित्रपटांपैकी श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्या 'स्त्री २' ला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद. चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली असली तरी चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर त्यांचं नेमकं काय मत आहे? प्रेक्षकांना चित्रपट पसंत पडलाय का? नेटकऱ्यांनी ट्विटरवर याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

स्त्री मध्ये एक स्त्री येत होती जी चंदेरी गावातील पुरुषांना घेऊन जायची. मात्र नंतर तिचं स्त्री या गावाची रक्षक बनली. आता चंदेरीमध्ये सरकटेची दहशत आहे. मात्र या युद्धात नेमकं कोण जिंकलाय? स्त्री २' प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरलाय का? नेटकऱ्यांनी ट्वीट करत याचं उत्तर दिलं आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे. चित्रपटाला नेटकऱ्यांनी सुपरहिट म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने ट्विट करत लिहिलं, 'अरे हे काय बनवलंय.. एक नं आहे. आम्ही हसून हसून पागल झालो.' तर दुसऱ्या युझरने लिहिलं, 'वाह वाह हे काहीतरी खूप वेगळं होतं. सगळं थिएटर हसत होतं. एकदम परफेक्ट. तुम्ही दाखवून दिलं की एका हिट चित्रपटाचा सिक्वेल कसा बनवायचा असतो. ते पण स्त्रीला जिवंत ठेवून.'

आणखी एकाने लिहिलं, 'ज्या पद्धतीने प्रत्येक पात्राला दाखवलं आहे ते भारी आहे. आपण प्रत्येक क्षणाला चकीत होतो. ओरडत राहतो. हे खूप भारी आहे.' दुसर्याने लिहिलं, 'एकाच वेळेला हसणं आणि भीती याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट उत्तम आहे. अमर कौशिक यांचं दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. जे आजकालच्या चित्रपटांमध्ये खूप कमी पाहायला मिळतंय.' एकूणच प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी ४० ते ५० कोटींची कमाई करेल असं सांगितलं जात आहे.

stree 2
Stree 2 Cameo: 'स्त्री २' मध्ये मोठा ट्विस्ट; चित्रपटात दिसला सुपरस्टार अभिनेता, नेटकरीही झाले चकीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.