Subodh Bhave: तर तुमचाच कडेलोट केला असता... 'हर हर महादेव'च्या ट्रोलर्सना सुबोध भावेने सुनावलं; म्हणाला- छत्रपतींची भूमिका

Subodh Bhave Slams Trollers Of Har Har Mahadev : लोकप्रिय मराठी अभिनेता सुबोध भाव याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'हर हर महादेव' या चित्रपटाच्या ट्रोलर्सना सुनावलं आहे.
subodh bhave
subodh bhave esakal
Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेता सुबोध भावे याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्याने मालिका चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. सुबोध विशेषतः बायोपिकसाठी ओळखला जातो. 'बालगंधर्व', 'डॉ. काशिनाथ घाणेकर असे अनेक चित्रपट हिट ठरले मात्र त्याच्या करिअरमधला सगळ्यात जास्त चर्चेत असणारा चित्रपट ठरला 'हर हर महादेव'. २०२२ साली आलेल्या या चित्रपटात सुबोधने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. मात्र त्यावरून त्याला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. आता त्यावर त्याने मन मोकळं केलं आहे.

सुबोधने चित्रपटात केलेली छत्रपतींची भूमिका अनेकांना रुचली नव्हती. तर चित्रपटात काही चुकीचे सीन दाखवण्यात आल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे काही ठिकाणी चित्रपटाचं प्रदर्शन बंद पाडण्यात आलं. आता या सगळ्यावर सुबोधने उत्तर दिलं आहे. सुबोधने नुकतीच नित्या टॉल्क या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तुम्हाला 'हर हर महादेव' हा चित्रपट चटका लावून गेला का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सुबोध म्हणाला, 'हो, मला 'हर हर महादेव' चित्रपट चटका लावून गेला. सेन्सॉर झालेला सिनेमा जेव्हा काही लोक बंद पाडतात, ज्या सिनेमाला सेन्सॉरने पास केलं तो सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये बंद पाडता तेव्हा त्रास होतो.'

सुबोध पुढे म्हणाला, 'तुम्हाला काय माहीत काय घडलं? हे होते का ३००- ४०० वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर? महाराजांबरोबर हे होते का? हे असते तर पहिला कडेलोट यांचाच केला असता. मी काय भावनेने महाराजांची भूमिका केलीये हे मला माहितीये. तुम्ही ते ठरवणारे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कुणी करायची याचे नियम छत्रपतींनी घालून दिलेले नाहीत. या महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येकजण त्यांचा मावळा आहे.' सुबोधच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याचा 'संगीत मानापमान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा टीझर प्रदर्शित झाला होता.

subodh bhave
Appacha Vishay Lay Hard: 'अप्पाचा विषय हार्ड' कोणी केला? कोण आहे या व्हायरल गाण्याचा गीतकार आणि गायक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.