Off Air Serial: स्टार प्रवाहवर नव्या मालिकांची मांदियाळी; 'या' लोकप्रिय मालिका घेणार निरोप? वाचा कुणाचा पत्ता होणार कट

Marathi Serial Going Off Air: स्टार प्रवाहवर पुन्हा तीन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे, आता कोणत्या मालिका ऑफ एअर जाणार आहेत?
marathi serial off air
marathi serial off air esakal
Updated on

सध्या मराठी वाहिन्यांवर टीआरपीची जोरदार लढत पाहायला मिळतेय. अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात झी मराठी, कलर्स मराठी आणि स्टार प्रवाहवरील नव्या मालिकांचा समावेश आहे. टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर राहण्यासाठी वाहिन्या चांगलाच जोर लावताना दिसत आहेत. अशात झी आणि कलर्सने एका नव्या मालिकांची घोषणा केली तिथे स्टार प्रवाहने मात्र तीन नव्या मालिकांची घोषणा केली.

'उधे गं अंबे' ही पौराणिक मालिका तर 'आई बाबा रिटायर होत आहेत' ही निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची मालिका नव्याने सुरू होणार आहे तर मृणाल दुसानिस, विजय आंदळकर यांची तिसरी मालिका पुढच्या दोन महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मात्र त्यासाठी स्टारच्या तीन मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहेत. नेटकरीही या मालिकांचा अंदाज लावताना दिसत आहेत. कोणत्या आहेत त्या मालिका?

स्टार प्रवाहवर सुरू असलेली 'सुखं म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका खूप जास्त ताणली गेली आहे, तर टीआरपीमधेही ती मालिका अगदी २०व्या स्थानावर आहे. त्यामुळे ही मालिका बंद होऊ शकते असा अंदाज लावण्यात येतोय. तर दुपारी सुरू असलेली 'शुभ विवाह' ही मालिका देखील खूप ताणलेली आहे. पुढे स्टोरी नसतानाही ती वाढवण्यात येतेय असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. अशीच परिस्थिती ११ वाजता प्रसारित होणाऱ्या 'लग्नाची बेडी या मालिकेचीदेखील आहे. त्यामुळे यापैकी एक मालिका बंद होऊ शकते. तर ६ वाजून ३० मिनिटांनी प्रदर्शित होणाऱ्या 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका आता शेवटापर्यंत येऊन ठेपली आहे.

सार्थक आणि आनंदी समोरासमोर आले आहेत तर सार्थक तिला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. त्यामुळे ही मालिका बंद होऊ शकते. तर दुपारच्या काही मालिका बंद करून संध्याकाळच्या मालिका त्याजागी प्रक्षेपित होऊ शकतात. तर अबोली मालिकेचा टीआरपी आता पुन्हा वाढत असल्याने ती बंद होण्याची शक्यता कमी आहे. आता स्टार प्रवाहावरच्या नक्की कोणत्या मालिका बंद होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.