अष्टपैलु अभिनेते अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर रोजी निधन झाले.अतुल यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अतुल हे यकृताच्या कर्करोगाने त्रस्त होते. या आजारावर मात करत अतुल हे पुन्हा कामावर रुजू झाले होते. सुर्याची पिल्ले या नाटकात ते झळकणार होते. या नाटकातुन अतुल परचुरे यांचा कमबॅक होणार होता. या नाटकाच्या तालमीलाही त्यांनी सुरुवात केली होती. मात्र प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ही झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या ५७ व्या वर्षी अतुल यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरे यांचे निकटवर्तीय मित्रमंडळी अजुनही या दु:खातून बाहेर आलेले नाहीत. अतुल यांच्या निधनानं सिनेमा, नाटक आणि मालिकाविश्वातही शोककळा पसरलीय.