Supriya Pilgaonkar: मी सचिनची बायको म्हणून त्यांना..., जया अमिताभ बच्चन वादानंतर सुप्रिया पिळगावकर यांचं स्पष्ट मत

Supriya Pilgaonkar On Calling By Husband Name: लोकप्रिय अभिनेत्री जया बच्चन यांचं संसदेतील नावाचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं. आता अशाच एका प्रश्नावर सुप्रिया पिळगावकर यांनी भाष्य केलं आहे.
supriya pilgaonkar
supriya pilgaonkar esakal
Updated on

लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांची जोडी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी ठरली. आज सचिन यांचा वाढदिवस आहे. अशातच सुप्रिया यांचं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या एका वक्तव्यामुळे संसदेमध्ये गदारोळ झाला होता. संसद अध्यक्षांनी त्यांना जया अमिताभ बच्चन म्हंटल्याने त्या भडकल्या होत्या. पतीशिवाय आपली काही ओळख आहे की नाही असा प्रश्न त्यांनी विचारला होता. असाच एक प्रश्न आता सुप्रिया यांना विचारण्यात आला होता. त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे.

माझी ओळख ही सचिनची बायको अशीच

सुप्रिया यांनी सचिन यांच्यासोबत लोकमत फिल्मीमध्ये हजेरी लावली होती. संसाराला ४० वर्ष झाल्यानंतर आज तुम्हाला सचिन यांची बायको म्हणून ओळखतात. त्याकडे तुम्ही कसं पाहता, असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया म्हणाल्या, 'तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मला कधी सुप्रिया अशी हाक ऐकूच आली नाही. ती हाक नेहमीच सचिनची बायको अशीच हाक ऐकू आली आहे. मी मराठीत सुद्धा एवढं काम केलं आहे पण तरीही माझी ओळख ही सचिनची बायको अशीच आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे. उलट मला खूप कौतुक आहे, या गोष्टीचं की ते मला सचिनची बायको म्हणूनच ओळखतात. इथे मला काही माझी वेगळी ओळख असं मला अजिबात वाटत नाही.'

यावर सचिन म्हणाले, 'आपल्या मराठी संस्कृतीमध्येच असं पूर्ण नाव घेतलं जातं. दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीमध्ये असं नाव घेतलं जात नाही. त्यामुळे त्यांना आवडण्या किंवा न आवडण्यापेक्षा त्यांच्या संस्कारात बसतं की नाही हे पाहणंही महत्त्वाचं आहे.' त्यांची प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाच्या सेटवर सुप्रिया आणि सचिन यांचं सूत जुळलं होतं. या चित्रपटाची शूटिंग संपताच सचिन यांनी त्यांना प्रपोज केलं आणि त्यांचं लग्न झालं.

supriya pilgaonkar
Lakhat Ek Aamcha Dada: जो विषय घराघरात लपवला जातो त्याला वाहिनीने घातला हात; मालिकेतील मासिक पाळीच्या भागावर नेटकरी म्हणतात-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.