Bigg Boss Marathi Grand Finale: 'बिग बॉस मराठी ५' चा हा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्यात मिड वीक एव्हिक्शन होणार आहे. घरातील सहा सदस्यांपैकी एक सदस्य बाहेर जाणार आहे. त्यात सूरजला प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा आहे. मात्र आता फक्त महाराष्ट्रातील जनताच नाही तर राजकारणी देखील बिग बॉसचे फॅन झाले आहेत. महाराष्ट्राचे राजकारणी बिग बॉस मराठीच्या स्पर्धकाला पाठिंबा देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या लाडक्या सदस्याला पाठिंबा देत जनतेला त्याच्यासाठी व्होट करण्याचं आवाहन केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी चक्क सुरज चव्हाणसाठी एक पोस्ट शेअर करत बारामतीकरांना त्याला वोट करण्यासाठी आवाहन केलं आहे.
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सूरज चव्हाणने जिंकावा, अशी सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचीही इच्छा आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन सूरज चव्हाणचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी व्होट अपिल केलं आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सुपुत्र, प्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय. देशभर त्यांची क्रेझ वाढली आहे. बिग बॉससारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये 274 लोकांमधून अंतिम 16 मध्ये त्याची निवड झाली, ही आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.'
त्यांनी पुढे लिहिलं, 'त्यामुळे आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून केवळ दोन मिनिटांचा वेळ काढून आपल्या लाडक्या सुरज चव्हाण यास वोट करून महाविजेता करण्यासाठी आपले योगदान देऊयात. त्यासाठी जिओ सिनेमा ऍप्लिकेशन इंस्टॉल करुन बिग बॉस मराठी या टॅबवर जाऊन व्होट नाऊ (Vote Now) वर गेल्यावर सूरजच्या फोटोवर टच करुन आपलं वोट सबमिट करा, ही विनंती.'
तर अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. बिग बॉस मराठीचा अंतिम टप्पा आता जवळ आला आहे! आपल्या सर्वांच्या आवडत्या बारामतीकर सुरज चव्हाणला जिंकवण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. त्याच्या कलेने आणि जिद्दीने त्याने आपल्या सर्वांच्या हृदयात खास जागा मिळवली आहे. चला, एकत्र येऊन सुरजला VOTE करूया आणि बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकुन आणुया!' सुरजसाठी सगळं पवार कुटुंब एकत्र आलंय असं म्हणायला हरकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.