सगळ्यांच्या नाकावर टिच्चून झापून झुपक सुरज झाला घराचा कॅप्टन; नेटकरी म्हणाले- आता फक्त कॅप्टन झालाय नंतर...

Suraj Chavan Became Captain Of Bigg Boss Marathi 5 House: 'बिग बॉस मराठी ५ च्या घराचा नवीन कॅप्टन ठरलाय सुरज चव्हाण. त्याच्यावरती नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
suraj chavan captain
suraj chavan captain esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ''बिग बॉस मराठी ५'. घरात दररोज घडणाऱ्या नव्या घटना आणि त्यावरून येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया हे सगळंच पाहायला रंगतदार ठरतंय. त्यात दिवसेंदिवस वाढणारी निक्कीची मुजोरी आणि टीम बीचा कल्ला हे पाहायला प्रेक्षकांना मजा येतेय. मात्र या आठवड्यात घरात अधिक गोष्ट घडलीये ज्यामुळे नेटकरी चांगलेच खुश झालेत. या आठवड्यात सगळ्याचा लाडका झापूक झुपक गुलिगत धोका कॅप्टन झाला आहे. अखेर सहाव्या आठवड्यात सुरजने कॅप्टनसी मिळवत सगळ्यांची तोंड बंद केली आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सूरज कॅप्टन झाल्यावर कलर्स वाहिनीकडून एक जबरदस्त प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यात सुरज दमदार पद्धतीने टास्क खेळताना दिसतोय. त्यात सुरज सगळ्यांना चांगलीच लढत देताना दिसतोय. तर बिग बॉस त्याचं कॅप्टन झाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. कॅप्टन झाल्यावर सगळेच त्याला मिठी मारताना दिसत आहेत. निक्की आणि पंढरीनाथ त्याला मिठी मारत आहेत. तर कॅप्टन झाल्यावर सुरज जेव्हा कॅप्टन रूमकडे येतो तेव्हा सगळ्यात आधी पाया पडतो. त्यानंतर तो बेडच्याही पाया पडतो हे पाहून नेटकरी पुन्हा त्याच्यावर फिदा झाले आहेत. तर दुसरीकडे चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

नेटकरी काय म्हणतायत?

सुरज कॅप्टन झाल्यावर नेटकरी प्रचंड खुश झाले आहेत. एका नेटकऱ्याने त्याचं कौतुक करत लिहिलं, 'तो आता जसा कॅप्टन झाला तसा जिंकू पण शकतो त्याला कमी लेखू नका.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'बिग बॉसच्या घराचा पाहावा कॅप्टन सुरज झालाय. तो खूप ताकदीचा आहे. आधी काहीजण बोलत होते सुरजला डोकं नाही. आता तर तो कॅप्टन पण झाला, आता काय म्हणतील?' आणखी एकाने लिहिलं, 'त्याला सगळे डिसिजन घेता येत नाही असे म्हणत होते ,आता तोच कॅप्टन झाला आहे .सगळे डिसिजन तोच घेणार, त्याला सगळ्यात कमकुवत समजणारे फक्त आता बघत बसणार, सुरज तुमचं मनापासून अभिनंदन.' प्रेक्षकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

suraj chavan captain
सचिन पिळगावकर यांनी श्रियाला 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये का नाही घेतलं? म्हणाले- स्वप्नील जोशीमुळे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.