मराठमोळा रीलस्टार सुरज चव्हाण याने याच्या साधेपणाने सगळ्यांची मनं जिंकली. त्याच्या साधेपणाला संपूर्ण महाराष्ट्राने पाठिंबा दिला आणि त्याने थेट 'बिग बॉस मराठी ५' चा किताब आपल्या नावे केला. जिंकल्यानंतर त्याच्या अनेक मिरवणूका काढण्यात आल्या. त्याचं राहत्या गावी जंगी स्वागत करण्यात आलं. त्याच्या वाढदिवसाला देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अनेकजण त्याला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेले होते. आता चाहते त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या लग्नाचीही आतुरतेने वाट पाहात आहेत. सुरज कुणाशी लग्न करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बिग बॉसच्या घरातही सुरजने अनेकदा लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र अशातच त्याने एका मुलाखतीत त्याला कशी बायको हवी हे सांगितलं आहे.
सुरजने नुकतीच माझा कट्टाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तुला कुणी बच्चा भेटला का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुरजने त्याच्या लग्नाबद्दलही सांगितलं. त्याला कशी मुलगी हवी हे सांगताना सुरज म्हणाला, 'अजून बच्चा बिच्चा काय भेटला नाय. पण मला मॅसेज लय येतात. पण मी सांगितलंय की साधी, सिंपल, साडी घालणारी मुलगी मी करणार. कारण कसंय, आमची आत्या आणि बहिणी बिग बॉसच्या घरात कशा आलेल्या तसं आवडतं माझ्या घरच्यांना. मी साधीच मुलगी बघणार आणि शुभमंगल सावधान करणार.'
सुरजचा नवीन सिनेमा 'राजा राणी' २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर तो लवकरच 'केदार शिंदे यांच्या 'झापूक झुपुक' या चित्रपटातही दिसणार आहे. त्याच्या वाढदिवसाला त्याने केदार शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी सुरजला खास भेटही दिली. सध्या सुरज त्याच्या गावच्या घरी अर्थात बारामतीला असतो. त्याच्या विजयानंतर बारामतीकरांसोबतच नेत्या सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी स्टेटस ताकात त्याचं अभिनंदन केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.