Swapnil Joshi: नवरात्री निमित्त कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचला स्वप्नील जोशी; खास पूजा करत घेतले आशीर्वाद

Swapnil Joshi Seek Blessing From Kamakhya Devi Temple: लोकप्रिय मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने नुकतंच नवरात्रीनिमित्त कामाख्या देवीचं दर्शन घेतलं
swapnil joshi
swapnil joshi esakal
Updated on

सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू असताना अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशी नुकताच कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचला. नुकतंच स्वप्नीलने कामाख्या देवीच दर्शन घेतलं आहे. कामाच्या धावपळीतून वेळ काढून स्वप्नीलने खास नवरात्रीच्या निमित्तानं कामाख्या देवीच दर्शन घेऊन सगळ्यासाठी प्रार्थना केली आहे. स्वप्नीलने सोशल मीडियावर कामाख्या मंदिराची झलक शेयर केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तो कामाख्या देवीच्या मांदिराबाहेर उभा आहे. सोबतच तो मंदिरात खास पूजाही करताना दिसतोय.

स्वप्नीलने कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता २०२४ हे वर्ष स्वप्नील साठी अगदीच खास ठरतंय ते त्याच्या अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समुळे! 'नाच गं घुमा' असू दे किंवा 'बाई गं' आणि आताचा 'नवरा माझा नवसाचा २' अश्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा प्रवास सुरू ठेवून त्याने नुकताच नवा प्रोजेक्ट्स घोषित केला. २०२४ मध्ये स्वप्नीलने निर्मिती विश्वात पदार्पण केलं सोबतीने त्याच्या 'वाळवी' चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला. आता तो नवरात्रीनिमित्त देवीच्या दर्शनासाठी पोहोचला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

यापूर्वी स्वप्नीलने चतुर्श्रुंगी देवीचं देखील दर्शन घेतलं होतं. स्वप्नील कायम चर्चेत असणारा अभिनेता आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात तो अनेक प्रोजेक्ट्स घेऊन येणार असल्याचं कळतंय. तो लवकरच 'सुशीला- सुजीत' या चित्रपटात दिसणार आहे. सोबतच त्याचा 'जिलेबी' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता प्रेक्षक त्याच्या या आगळ्या वेगळ्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

swapnil joshi
सुरज चव्हाण जिंकताच गावात झाला एकच कल्ला! 'गुलीगत पॅटर्न' वर थिरकले गावकरी, व्हिडिओ होतोय व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.