लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. नुकताच तिचा 'येक नंबर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने अभिनेत्री म्हणून भूमिका केली आहेच सोबतच ती या चित्रपटाचीनिर्माती देखील आहे. आता तेजस्विनीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्रीच्या घरात नव्या पाहुणीचं आगमन झालंय. तेजस्विनी मावशी झाली आहे. तिने बाळासोबतचे खास फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. तब्बल १४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तेजस्विनीची बहीण आई झाली आहे. आता तेजस्विनीने खास पोस्ट शेअर केलीये.
तेजस्विनीची बहिणी पूर्णिमा पुलन आई झाली आहे. पूर्णिमाने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. तेजस्विनी पंडितने आपल्या भाचीचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'माझ्यासाठीची सगळ्यात ‘मोठी’, सगळ्यात ‘खास’ आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींने मला दिली आहे. आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली! अनेक वर्ष या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला १४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला.'
तेजस्विनीने पुढे लिहिलं की, 'त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं. पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षणचं नव्हे तर आयुष्य देखील या ‘कन्यारत्नाने’ उजळून टाकलं. आमच्या कुटुंबाची ‘कथा’ सुफळ संपूर्ण म्हणुया? ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय. होऊ दे खर्च…तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…शुभ दीपावली…शुभं भवतु.' तेजस्विनीवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. फक्त नेटकरीच नाही तर कलाकारांनीदेखील तिला शुभेच्छा देत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.