Yek Number On OTT: तेजस्विनी पंडितचा ‘येक नंबर’ आता ओटीटीवर; वाचा कधी नाही कुठे होणार प्रदर्शित

Yek Number OTT Release: धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'येक नंबर' या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे आणि निर्मिती तेजस्विनी पंडित व वारदा नाडियादवाला यांनी केली आहे.
yek number on ott
yek number on ottesakal
Updated on

राजेश मापुस्कर या व्हिजनरी दिग्दर्शकाने दिग्दर्शन केलेला चित्रपट 'एक नंबर' आता ओटिटीवर धडकणार आहे. प्रेम व राजकीय महत्त्वाकांक्षेचे कथानक असलेल्या या चित्रपटात धैर्य घोलप व सायली पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. झी स्टुडिओज, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेनमेंट व सह्याद्री फिल्म्स या बॅनरअंतर्गत तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांची ही निर्मिती असून ‘येक नंबर’मध्ये रोमान्स, नाट्य, राजकीय उत्कंठावर्धक घडामोडी आणि थरार यांची सांगड घातलेली आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.

ही कथा सधनपूरच्या प्रतापभोवती फिरते. तो गावातील एक उमदा आणि राजकारणात करिअर घडवण्याचा प्रयत्न करणारा तरुण आहे. पिंकी या आपल्या बालमैत्रिणीचे मन जिंकण्याचा तो प्रयत्न करत असतो. पिंकी राज ठाकरे यांची चाहती आहे आणि त्यांच्या विचारांचा तिच्यावर मोठा पगडा आहे. "तुझे माझ्यावर प्रेम असेल तर तू राज साहेबांना गावात आण.", अशी गळ पिंकी प्रतापला घालते. आपले प्रेम साध्य करण्यासाठी प्रताप हे अशक्यकोटीतील आव्हान स्वीकारतो आणि अनपेक्षितपणे तो राज साहेबांशी संबंधित एका हत्येच्या कटात गोवला जातो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रतापला योग्य-अयोग्याच्या गढूळ पाण्यातून मार्ग काढावा लागतो आणि या प्रवासात धक्कादायक वळणांनी भरलेली एक थरारक कथा उलगडत जाते.

‘येक नंबर’ हे एक खिळवून ठेवणारे कथानक आहे आणि यात राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रेम व राजकारणाचे नाट्य गुंफलेले आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील रांगडेपणा आणि शहरातील आव्हाने यांची सांगड घालून या चित्रपटात प्रेम, महत्त्वाकांक्षा, राजकीय विचारधारा या भावनांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट मनोरंजन करण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडतो. हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.

yek number on ott
नातेवाईक ६ नंबर म्हणायचे... प्रणित हाटेने सांगितला बालपणीचा कटू अनुभव; काकाने साडी नेसताना पकडलं आणि

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.