...म्हणून 'ठरलं तर मग'च्या पूर्णा आजीने घेतली स्वतःची कार; लेक तेजस्विनीने सांगितलं कारण, म्हणाली- या हट्टी बाईने

Tharla Tar Mag Fame Purna Aaji Aka Jyoti Chandekar Buy New Car: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजीने वयाच्या ६८ व्या वर्षी स्वतःची गाडी घेतली आहे.
purna aaji new car
purna aaji new car esakal
Updated on

छोट्या पडद्यावर गाजणारा कार्यक्रम 'ठरलं तर मग' सध्या सगळ्यांच्या मनावर राज्य करतोय. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. अर्जुन सायलीसोबतच मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसतेय ती म्हणजे पूर्णा आजी. मालिकेत ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर साकारत आहेत. त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या आई आहेत. नुकतीच तेजस्विनीने आईबद्दल एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ज्योती यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी स्वतःची गाडी घेतली आहे. त्यांनी हट्टाने ही गाडी घेतली असल्याचं तेजस्विनीने सांगितलंय.सोबतच तिने पोस्ट करत आईचं कौतुकही केलंय.

तेजस्विनीने ज्योती यांचे नव्या गाडीसोबतचे फोटो शेअर करत तेजस्विनीने लिहिलं, 'ज्योती चांदेकर, ५२ वर्षाची कारकीर्द! आजतागायत २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर असणारी मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आणि मग माझी आई. आई यासाठी नंतर कारण काही व्यक्तिमत्त्व ही कामासाठी आधी आणि घरच्यांसाठी नंतर बनलेली असतात. आईने काम सुरु केलं तेव्हा ती १२ वर्षांची होती. मग तिचं लग्न झालं तरी तिने काम करणं सोडलं नाही. मग २ मुली झाल्या. आम्हाला बरोबर घ्यायची आणि ‘ती’ कायम काम करायची. मग मुली कमवायला लागल्या तरीही ‘ती’ काम करतच होती आणि अजूनही ‘ती’ काम करतेच आहे. To cut it short, या सगळ्या प्रवासात तिची एक तक्रार होती.'

अभिनेत्रीने पुढे लिहिलं, 'खूप फिरले, बसने, ट्रेनने, लोकल गाड्यांनी, आधी बाबाने घेतलेल्या, मग लेकीने घेऊन दिलेल्या, मग काही काळ धैर्यच्या गाडीने प्रवास केला… आता मला माझी गाडी हवी आहे आणि शेवटी या हट्टी बाईने, माझ्या आईने वय वर्ष ६८ व्या वर्षी तिच्या कमाईची, स्व:कष्टाची, स्वतःची गाडी घेतलीच! माझ्या आईच्या तिच्या कामाप्रती असलेली श्रद्धा आणि जिद्दीला सलाम आणि माझ्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून नकळत ही ठरली आमच्यासाठी ‘येक नंबर मोमेंट’. आई तुला खूप प्रेम आणि सगळ्यांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!' तेजस्विनीची ही पोस्ट पहाऊन नेटकऱ्यांनी पूर्णा आजीचं कौतुक केलं आहे. तर चाहत्यांनी ही त्यांच्या जिद्दीला सलाम केलाय.

purna aaji new car
नवरात्रीच्या मुहूर्तावर रुबीना दिलैकने दाखवला जुळ्या मुलींचा चेहरा; वडिलांसोबत खेळणाऱ्या चिमुकल्यांना पाहून नेटकरी म्हणाले-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.