Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग' मध्ये नवा ट्वीस्ट; अखेर प्रतिमा बोलू लागली, आता सगळ्यांचं पितळ उघडं पडणार?

Tharla Tar Mag Update: छोट्या पडद्यावरील कार्यक्रम 'ठरलं तर मग'मध्ये नवीन ट्वीस्ट आला आहे. प्रतिमांची वाचा परत येणार
tharla tar mag
tharla tar mag esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'ठरलं तर मग' मध्ये आता प्रेक्षक ज्याची वाट पाहत होते तेच घडणार आहे. गेले कित्येक महिने अभिनेत्री जुई गडकरी हिच्या 'ठरलं तर मग' या कार्यक्रमाने टीआरपी यादीत पहिला क्रमांक अढळ ठेवला आहे. जुईची ही मालिका सगळ्यांच्या मनावर राज्य करतेय. मात्र मालिका आता पुढे कधी सरकणार, पुढचं कथानक काय असणार, प्रतिमाची स्मृती परत कधी येणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना सध्या पडले आहेत. मात्र आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मालिकेत मोठा ट्वीस्ट येणार आहे. प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे तेच होणार आहे. प्रतिमाची वाचा परत येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीच्या इंस्टाग्राम पेजवर या मालिकेची नवी अपडेट शेअर केली आहे. वाहिनीच्या पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पूर्णा आई या सगळ्यांची वाट पाहत आहेत. तर अर्जुन सायली, रविराज साले प्रतिमाला डॉक्टरकडे घेऊन गेले आहेत. सायकॅट्रिस्टची भेट घेतल्यानंतर आता प्रतिमामध्ये मोठा बदल होणार आहे. प्रतिमा चक्क बोलू लागणार आहे. प्रतिमा इतक्या वर्षांनी पूर्णा आईला आई म्हणून हाक मारणार आहे. तिचा आवाज ऐकून पूर्णा आई देखील प्रचंड आनंदी होणार आहे. तर ही सगळी कमाल सायलीच्या कल्पनेची आहे.

प्रियाचं धाबं दणाणलं

प्रतिमाच आवाज परत आल्याने प्रिया मात्र थक्क झाली आहे. तिला शॉक बसला आहे. तिचा आवाज परत आल्यामुळे आता आपलं खोटं सगळ्यांसमोर येणार का? महीपतची ओळख पटणार का? नागराजचं सगळं कारस्थान उघडकीस येणार का असा प्रश्न प्रियाला पडला आहे. त्यामुळे ती मनातून घाबरली आहे. तर घरातील सगळेच खुश आहे. मालिकेची कथा अशाच ट्वीस्ट आणि टर्नसोबत पुढे सरकत राहिली तर अजून अनेक महिने टीआरपी यादीवर याच मालिकेची सत्ता राहील हे नक्की.

tharla tar mag
ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.