नाटक करताना अचानक तब्येत खालावली... अभिनेता अतुल तोडणकरला ब्रेन हॅमरेज, पोस्ट करत सांगितलं काय घडलं

Actor Atul Todankar Suffered From Brain Hamrage: अभिनेता अतुल तोडणकर याला अचानक ब्रेन हॅमरेज झालं. त्यानंतर जणू आपला पुनर्जन्मच झाला असल्याचं त्याने लिहिलं.
atul todankar
atul todankar esakal
Updated on

मराठी सिनेसृष्टी ही बाहेरून झगमगाट आणि डोळे दिपवणारी दिसत असली तरी तिचं सत्य वेगळंच आहे. प्रचंड कामाचा ताण, अपुरी झोप, अनियमित कामाच्या वेळा या सगळ्यामुळे अनेक कलाकारांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. अनेकांच्या तब्येतीवर याचा परिणाम झाला आहे. कलाकार याबद्दल अनेकदा तक्रार करताना दिसतात. आता लोकप्रिय अभिनेता अतुल तोडणकर यानेही त्याचा एक धक्कादायक अनुभव शेअर केलाय. कामाच्या व्यापामुळे अतुलला ब्रेन हॅमरेज सारख्या मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं. नाटकाच्या मंचावर त्याची प्रकृती ढासळली. त्यातून तो वाचला मात्र त्याने हा अनुभव आता इतरांसोबत शेअर केला आहे.

अतुलने पोस्ट करत सांगितलं नेमकं काय घडलं

अतुलने एक पोस्ट करत लिहिलं, 'ही पोस्ट शेअर करण्यामागे खास कारण आहे.. बरेचदा आपल्या आजारपणाची योग्य आणि उत्तम ट्रीटमेंट कुठे मिळेल हे माहीत नसतं आणि एकदा का वेळ निघून गेली की आपल्या हाती काहीही उरत नाही, म्हणून हा पोस्ट प्रपंच.. माझे दोन वाढदिवस आहेत. एक जन्मदिवस आणि दुसरा पुनर्जन्म दिवस.. नाटक - मालिका - सिनेमा या तीनही क्षेत्रात उत्तम काम चालू होतं.. आणि अचानक 21 जानेवारी 2024 ला " एका लग्नाची पुढची गोष्ट " या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक अस्वास्थ्याला सामोरं जावं लागलं, ब्रेन हॅमरेज झालं..सगळं थांबलं आणि जवळपास सगळं संपल्याची जाणीव झाली.

त्याने पुढे लिहिलं, 'परमेश्वराची कृपा, आईवडील, बायको- मुलगा, सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या उपचारामुळे यातून ठणठणीत बरा झालो. पण त्याकरता 6-7 महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि सर्वात महत्वाचे...सर्वोत्तम उपचार मिळाले. आमच्या चंदेरी दुनियेत काम करताना अवेळी जेवण, कामाच्या मोकाट वेळा, अपुरी झोप व आराम यामुळे तुमची शरीर प्रकृती आतून पोखरत जाते आणि असा अचानक विस्फोट होतो जो दुर्दैवाने माझ्या बाबतीत झाला.

त्याने पुढे लिहिलं, 'आम्ही सगळेच कलावंत आपापली काळजी घेत असतोच. जिम, योगा, मेडिटेशन, स्किन आणि केसांची काळजी घेत असतोच पण अंतर्गत शरीर स्वच्छता करायचं विसरतो. मी 7 दिवसात माझ्या शरीराची अंतर्गत स्वच्छता करून आलो. आणि माझी प्रकृती कमालीची सुधारलीय.. वर्षातून किमान 7 दिवस तरी स्वतःच्या तब्येतीसाठी द्यायचेच.' अतुल ठणठणीत बरा होऊन पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी उभा राहील अशी आशा करत चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.

atul todankar
निक्की जे वागली ते सगळं माफ? आर्याला घराबाहेर केल्याने भडकला मराठी अभिनेता, पोस्ट करत मेकर्सना सुनावलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.