ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीची मोठी झेप; झळकणार हिंदी सीरिजमध्ये, हृता दुर्गुळेसोबत शेअर करणार स्क्रीन

Marathi Actress In Commandar Karan Saxena: 'ठिपक्यांची रांगोळी' फेम लोकप्रिय मराठी अभिनेत्री आता हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणारा आहे.
dnyanada ramtirthkar
dnyanada ramtirthkarsakal
Updated on

सध्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये अनेक मराठी कलाकार आपल्या अभिनयाची छाप पाडताना दिसतात. हिंदी प्रेक्षकांकडूनही मराठी कलाकारांना प्रचंड प्रेम मिळतं. तर छोट्या पडद्यावरीलही अनेक कलाकारही नंतर मोठ्या पडद्यावर किंवा वेबसीरिजमध्ये झळकताना दिसतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे कलाकार आपल्या कामाच्या कक्षा विस्तारून नवी झेप घेताना दिसतात. अशीच एक छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आता हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. मोठ्या कलाकारांसोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ही अभिनेत्री आहे ज्ञानदा रामतीर्थकर.

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. तिच्या अप्पू या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. आता ज्ञानदाने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी दिली आहे. ज्ञानदा लवकरच 'कमांडर करण सक्सेना' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ज्ञानदाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती तिच्या व्हॅनिटी व्हॅन बाहेर दिसतेय. या सीरिजमधील तिच्या भूमिकेचं नाव मिली आहे. तिने तिच्या भूमिकेतील वेषभूषेसह काही फोटो शेअर केले आहेत. यात ती समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. तर एका फोटोत ती हाताने लव्हचा इमोजी बनवताना दिसत आहे.

ही बातमी शेअर करताच चाहत्यांनी ज्ञानदावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे ही देखील मुख्य भूमिकेत आहे. हृताची देखील ही पहिलीच हिंदी सीरिज आहे. यासोबतच अभिनेता गुरमीत चौधरी आणि इकबाल खान मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज ८ जुलै रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

dnyanada ramtirthkar
Ashadhi Wari 2024: हेच खरं सुख! टाळांच्या ठेक्यावर नाचली, फुगडी खेळली, वारीच्या रंगात रंगली मराठी अभिनेत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.