Aai Tuljabhawani: कलर्स मराठीवरील नव्या मालिकेत 'ही' अभिनेत्री दिसणार 'आई तुळजाभवानी'च्या भूमिकेत; नवा प्रोमो समोर

Colors Marathi New Serial Aai Tuljabhawani Cast: कलर्स मराठीवर नुकतीच नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.
aai tuljabhawani
aai tuljabhawani esakal
Updated on

Aai Tuljabhawani Cast on Colors Marathi Serial: छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात स्टार प्रवाह आणि कलर्स मराठीचा समावेश आहे. या मालिकांमध्ये दोन पौराणिक मालिकादेखील आहेत. कलर्स मराठीवर लवकरच 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र त्यात या मालिकेत मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल माहिती देण्यात नव्हती. आता या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात मालिकेत आई तुळजाभवानीची भूमिका कोण साकारणार हे उघड करण्यात आलं आहे. मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक आनंदी झाले आहेत.

कोण आहे तुळजाभवानी साकारणारी अभिनेत्री

नुकताच या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यात आई तुळजाभवानीचा संपूर्ण लूक दाखवण्यात आला आहे. आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा दाखवण्यात आला आहे. या मालिकेत 'आई तुळजाभवानी'च्या रुपात अभिनेत्री पूजा काळे दिसणार आहे. अभिनेत्रीचा प्रोमोमधून लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. पूजा भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने विशारद पूर्ण केले आहे. तसेच कथ्थकचंही शिक्षण तिने घेतलं आहे. तिचा तुळजाभवानीच्या रूपातील पहिला लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

पूजा काळे भूमिकेबद्दल काय म्हणाली?

'आई तुळजाभवानी' मालिकेतल्या मुख्य भूमिकेबद्दल पूजा काळे म्हणाली,"आई तुळजाभवानी'ची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. मालिकेची संपूर्ण अनुभवी टीम आणि तिचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या मार्गदर्शनाने 'आई तुळजाभवानी' ही भूमिका मनापासून साकारुन प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन असा दृढ विश्वास मी व्यक्त करते".

aai tuljabhawani
Limbu Firawla Song : ‘लिंबू फिरवलंय’मध्ये अमेय आणि गौतमी; धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.