Marathi Serials: कमी TRPचा फटका! झी अन् कलर्स मराठीवरील एक दोन नव्हे तर चार मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Zee Marathi Colors Marathi Off Air Serial: गेल्या २ महिन्यात अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता आणखी काही मालिकांची घोषणा करण्यात आली आहे.
marathi serial off air
marathi serial off air esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय. काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात तर काही मालिका प्रेक्षकांच्या नाराजीला कारणीभूत ठरतात. या मालिकांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. त्यामुळे त्यांच्या टीआरपीवरही त्याचा परिणाम होतो. आता अशाच काही कमी टीआरपी असलेल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता झी मराठीवर आणि कलर्स मराठीवर काही नवीन मालिका येणार आहेत. त्यामुळे काही जुन्या मालिकांना डच्चू मिळणार आहे.

झी मराठी वाहिनी

झी मराठी वाहिनी आणि कलर्स मराठी वाहिनी सातत्याने टीआरपीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत. त्यामुळेच पुन्हा एकदा काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठीवर नुकताच 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेचा प्रोमो दाखवण्यात आला. ही मालिका कधी सुरू होणार हे उघड झालं नसलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार झी वरील 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका निरोप घेणार असल्याचं कळतंय. मालिकेत आता चांगला ट्रॅक सुरू असला तरी निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कलर्स वाहिनी

तर कलर्स वाहिनीवर काही दिवसांपूर्वी 'आई तुळजाभवानी' या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. त्याचा एक प्रोमोही प्रदर्शित झाला होता. तर यापूर्वी 'दुर्गा' ही मालिका २६ ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यापूर्वीच्या 'अंतरपाट' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता कलर्सवरील 'अबीर गुलाल' आणि 'सुख कळले' या दोन मालिकादेखील आता निरोप घेणार असल्याचं समजतंय. त्यांच्या जागी दोन नव्या मालिका भेटीला येणार आहेत. तर स्टार प्रवाहवर देखील 'उदे गं अंबे' या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी कोणती मालिका निरोप घटणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

marathi serial off air
तब्बूवर प्रेम असूनही नागार्जुनने तिच्याशी लग्न का केलं नाही? पत्नी म्हणालेली- फिल्म इंडस्ट्रीतली घाण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.